विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करायचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षासोबतची युती तोडली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसवत मुख्यमंत्रीपद मिळविले. यातूनच पुढचे रामायण घडले आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना ठाकरे गटाची शिल्लक सेने झाली. आता ही शिल्लक सेनाही टाकतेय की नाही अशी परिस्थिती असताना ठाकरे गटाला पुन्हा मुंगेरीलाल के हसीन सपने पडू लागले आहेत. आदित्य ठाकरे याना मुख्यामंत्री करायचंय ! ( Mungerilal Ke Hasin SapneQuestion of party survival and Chandrakant Khaire says Aditya Thackeray will be the Chief Minister in 2029)
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर ठाकरे गटाची अवस्था तोळामासा झाली आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाची पूर्णत: वाताहत झाली. त्यानंतरही पक्षातून आऊटगोईंग सुरू आहे. पक्षाचा कोणता नेता कधी सोडून जाईल याचा भरवसा राहिलेला नाही. तरीही माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी २०२९ मध्ये आदित्य ठाकरे मुख्यमंत्री हाेणार असा आशावाद व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुढील निवडणुकीपर्यंत राहत नाही, असा दावा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. शिवसेनेचे ( ठाकरे गट ) ज्येष्ठ नेते, चंद्रकांत खैरे याला उत्तर देताना म्हणाले, 2029 मध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखील निवडणुका होतील आणि ते मुख्यमंत्री बनतील, असे म्हटले आहे.
राज्यात २०१९ च्या निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने एकत्र लढविल्या. युतीला पूर्ण बहुमत मिळाले, मात्र सरकार स्थापनेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोडा घातला. शिवसनेच्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री करेल असे वचन आपण दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याना दिले होते. त्या मुद्यावर ठाकरे यांनी युती तोडली. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केली. यावेळी शिवसेनेचे त्यावेळी ज्येष्ठ नेटनेते असलेले एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे होते असे स्पष्ट झाले. शिवसेनाशिवसेना कार्यकर्ता नव्हे तर त्यांनाच मुख्यमंत्री होते. त्यासाठी हिंदुत्वाचा त्याग करायलाही त्यांनी मागे पुढे पहिले नाही.
नंतर जे घडले तो इतिहास होता. ठाकरे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून एकनाथ शिंदे यांनी अनेक ज्येष्ठ नेत्यांसह बंद केले. भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण केले.
खैरे यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट जुन्या मार्गाने जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षात आता जे काही नेते नुरले आहेत त्यांच्या डोक्यावर आदित्य ठाकरे याना आणून बसविण्याचे ठाकरे गटात घाटत आहे. पुन्हा एकदा घराणेशाहीच्या मार्गावर पक्ष नेण्याच्या विचाराने कार्यकर्ते सैरभर होऊ लागले आहेत.
