खंडणी मागणाऱ्या ठाकरेंच्या नेत्याला अटक

नवी मुंबई : मिठाई दुकानदाराकडे तब्बल तीन लाखांची खंडणी मागणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांना अटक केली आहे. किशोर लोंढे असे या नेत्याचे नाव असून त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Thackeray leader arrested for demanding ransom)
नवी मुंबईतील प्रसिद्ध मनमोहन मिठाईवाल्याला पालिकेच्या कारवाईची धमकी देत तब्बल तीन लाख रुपयांची खंडणी मागितली होती.मनमोहन मिठाईवाला या नावाने कोपरखैरणे, वाशी, सानपाडा आणि घनसोली येथे चार मिठाईची दुकाने चालवली जातात. या दुकानांच्या बाहेरील जागेबाबत किशोर लोंढेने महापालिकेकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संबंधित दुकानांवर कारवाई होऊ नये यासाठी लोंढेने दुकानमालक जगदीश चौधरी यांच्याकडे 3 लाख रुपयांची खंडणी तसेच दरमहा 15 हजार रुपयांचा हप्ता मागितला दुकान वाचवण्यासाठी मनमोहन मिठाईवाल्याने तडजोडीनंतर दोन लाख रूपये रोख आणि 15 हजार रूपये महिना देण्याचे ठरले. तरी देखील लोंढे दबाव टाकत होता, त्यासाठी त्याने पुन्हा एकदा मिठाईवाल्याला भेटीसाठी बोलवले आणि उर्वरित रकमेसाठी दबाव टाकत होता. त्यानंतर त्रास असह्य झाल्याने दुकानदाराने थेट पोलिस स्थानक गाठले. पोलिसांनी लोंढे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.