एकनाथ शिंदेंवर टीकेवरून गुलाबराव पाटील संतप्त, काढला ठाकरेंचा परदेश दौरा

विशेष प्रतिनिधी

बुलढाणा: तुम्ही परदेशात थंड हवा खाण्यासाठी गेलात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपत्तीत सर्वात आधी धावून गेले तरी टीका करता असा संताप शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
( Gulabrao Patil angry over criticism of Eknath Shinde questioned Thackerays foreign tour)

बुलढाण्यात बोलत असताना पाटील म्हणाले, आम्ही परदेशात थंड हवा खायला गेलो नाही तर आपत्ती आली त्यावेळी सगळ्यात अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले. तुम्ही त्यांना बदनाम करता? जे गुवाहाटीला गेले ते निवडून येणार नाही असे म्हटले जात होते . पण लाडक्या बहिणीने चमत्कार केला. त्या संजय राऊतच्या छाताड्यात भगवा झेंडा गाडून निवडून आलो.

सरकारकडून मिळत असलेल्या निधीवर ते म्हणाले, माझ्या सी क्लास नगरपालिकेत किती पैसे द्यावेत. माझा बाप आला तरी तो बोलणर नाही. माझ्या नगरपालिकेचे मतदान २४ हजार आहे आणि ३३९ कोटी रुपये दिले. ३३९ कोटी आणि पत्र दिलं आला गल्ला. आम्हाला वाटलं आम्ही स्वप्नात आहे का? आम्ही असं तस निवडून आलो नाही, छप्पर फाड के निवडून आलो. पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचा सिंचनाचा विषय घेतला. आघाडीच्या काळात फक्त चार प्रकल्पांना मान्यता दिली, पण युतीच्या काळात दीडशे प्रकल्पांना मान्यता दिली. जो उठाव केला तो उठाव एकनाथ शिंदे यांनी दाखविला. शिवसेना दावणीला बांधणीचे काम केले. एकही आमदार निवडून येणार नाही म्हणायचे पण 60 जागा निवडून आल्या. बाळासाहेबांची विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना कोणाची यावर शिक्कामोर्तब जनतेने केले आहे.