रावसाहेब दानवे यांच्या कारला लोणावळ्यात अपघात,

विशेष प्रतिनिधी
लोणावळा : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारला अपघात झाला. लोणावळ्यातील जयचंद चौकामध्ये रावसाहेब दानवे यांच्या कारला एका दुचाकीने जोरदार धडक दिली आहे. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. ( Raosaheb Danves car met with an accident in Lonavala)

विशेष म्हणजे माजी केंद्रीय मंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांच्याशी दुचाकीस्वाराने हुज्जत घातली. शेवटी रिक्षाचालकांनी वाद मिटविला.

रावसाहेब दानवे हे कामासाठी लोणावळ्यातील बाजारपेठेत आले होते. त्यावेळी एक दुचाकीने रावसाहेब दानवे यांच्या आर्टिका गाडीला धडक दिली. यात दुचाकीस्वाराच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. या अपघातानंतर मोटारसायकल स्वाराने रावसाहेब दानवे यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली.

यानंतर स्थानिक रिक्षाचालकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. रावसाहेब दानवेही यावेळी त्या ठिकाणी उपस्थित होते.