पहलगाममधील क्रूर हत्येला भारताने दिलेले प्रत्युत्तर , अमित शहांनी दिले आणखी मोठ्या कारवाईचे संकेत

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. ऑपरेशन सिंदूर हे पहलगाममध्ये आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेले प्रत्युत्तर आहे. भारत आणि येथील नागरिकांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याचा मोदी सरकारचा निर्धार आहे. ( Indias response to the brutal killing of innocent in Pahalgam Amit Shah hints at even bigger action)

शहांनी ट्विटरमध्ये सूचक विधान करताना भारत आणखी मोठी कारवाई करू शकते असेही संकेत दिले आहेत. दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी भारताने दृढनिश्चय केल्याचे शहांनी म्हटले आहे.

ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्यानंतर जगभरातील भारतीयांसह इतर काही देशांनीही भारतीय लष्करावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सोशल मीडियात पोस्ट करत आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील 26 निष्पाप नागरिकांच्या हत्येचा बदला भारताने घेतला आहे. पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करत भारताने पाकिस्तानला अद्दल घडवली आहे.या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया आली असून त्यांनी मोठे संकेत दिले आहेत. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 26 पर्यटकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याचा मध्यरात्री भारतीय लष्कराने बदला घेतला. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांची 9 ठिकाणे हवाई दलाच्या राफेल विमानांनी उध्वस्त केली.