पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जगातील सर्वोत्तम नेता’, एलन मस्क यांच्या वडिलांनी केले भारताच्या प्रगतीचे भरभरून कौतुक

विशेष प्रतिनिधी

मुंबई : जागतिक पातळीवरील सुप्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांचे वडील एरॉल मस्क सध्या भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगातील सर्वोत्तम नेता म्हणून त्यांनी कौतुक केले आहे. मोदी नेहमी दूरदृष्टीने विचार करतात आणि भारताला ‘विश्वगुरू’ बनवण्याच्या दिशेने नेत आहेत,” असे मस्क म्हणाले.
( Prime Minister Narendra Modi is the best leader in the world Elon Musks father Errol Musk highly praised Indias progress)

एरॉल मस्क सध्या सर्वोटेक पॉवर सिस्टीम्स या ग्रीन एनर्जी क्षेत्रातील भारतीय कंपनीचे ग्लोबल अ‍ॅडव्हायझर म्हणून भारतात आले आहेत. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, भारत सध्या ‘विश्वगुरू’ होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि हे सर्व मोदींमुळे शक्य झाले आहे. भारत आता जगातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे तो आपोआपच एक जागतिक महासत्ता ठरतो. भारताला आपल्या प्रगतीचा गर्व नाही. भारत इतर अनेक देशांप्रमाणे आत्मप्रशंसा करत नाही. हे खूपच महत्त्वाचं आहे.

काश्मीरमधील दहशतवादावर परखड मत व्यक्त करताना ते म्हणाले, लोकांना अशा परिस्थितीत जगू द्यायला नको. जर पाकिस्तानच या सगळ्या त्रासाचे कारण असेल, तर काहीतरी ठोस उपाययोजना आवश्यक आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.

भारत सरकारच्या नव्या इलेक्ट्रिक व्हेईकल्स आयात धोरणाचे त्यांनी जोरदार समर्थन केले आहे. सरकारने १५% सवलतीने ८,००० इलेक्ट्रिक कार्स आयात करण्यास परवानगी दिली आहे, मात्र त्यासाठी ₹४,१५० कोटींची गुंतवणूक भारतात करावी लागणार आहे. ही खूपच चांगली योजना आहे. यामुळे ईव्ही क्षेत्राला चालना मिळेल आणि संपूर्ण जगासाठी पर्यावरणपूरक भविष्य घडेल,” असे एरॉल मस्क म्हणाले.

हिंदू धर्म इतका प्राचीन आहे की तो मला थक्क करतो. जर संपूर्ण जगाने भगवान शिवाच्या तत्वज्ञानाचे पालन केले, तर जगात समतोल व शांतता निर्माण होईल, असेही ते म्हणाले.