बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटाला उद्धव ठाकरेंसारखा मुलगा जन्माला यावा दुर्देवी, गोपीचंद पडळकर यांची टीका

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सर्व देश हिंदुत्ववादी नेता म्हणून पाहतो. मात्र त्यांचा मुलगा मतांसाठी दाढ्या कुरवाळतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटाला उद्धव ठाकरेंसारखा मुलगा जन्माला यावा ही दुर्देवी बाब आहे अशी जहरी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या घरी रोज लाल दिव्याच्या गाड्या जायच्या. आज त्यांच्या घरी कोणीही जात नाही. त्यामुळे आता भाजपचे माप काढण्यात वेळ वाया घालवू नये. तुम्ही पण उद्धव ठाकरेंकडे जास्त लक्ष देऊ नका. लोकं त्यांना सोडून जात असल्याने त्याची मानसिकता खचली आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, संजय राऊत हे अडचणीत आहेत. त्यांना काही पूजा करायची असेल, तर त्यांनी मला सांगावे. संजय राऊत यांना जर चांगली पूजा घालायची असेल, तर मी त्यांना बगलामुखीची पूजा घालून देतो. संजय राऊत यांनाही चांगली सुबुद्धी यावी. पूजा करणे गरजेचे आहे. त्यासाठी 101 ब्राह्मण बोलवून आपण पूजा करू, संजय राऊत ज्या ठिकाणी सांगतील, त्या ठिकाणी पूजा करतो.

लँड जिहाद‎ करणाऱ्याना धडा शिकवा असे आवाहन करताना पडळकर म्हणाले, जिल्हाधिकारी,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आयुक्त, सीईओ यांनी तत्काळ आपापल्या‎ परिसरातील अतिक्रमण उद्ध्वस्त करावे. लव्ह‎ जिहाद बंद करण्यासाठी आई-वडिलांनी ‎वेळीच लक्ष दिले पाहिजे, मुलींना, महिलांना ‎ब्लॅकमेलिंग करून फसवले जाते.‎ पाकिस्तान जिंकल्यावर फटाके‎ फोडणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई वेळीच ‎करावी. धर्मांतरासाठी प्रयत्न करणाऱ्यांना ‎ठोकून काढा. धर्मांतर विरोधी कायदा वेळीच‎ झाला पाहिजे. वाकड्या नरजेने पहाणाऱ्यांचा ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎वेळीच बंदोबस्त करावा.