विशेष प्रतिनिधी
बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दणदणीत विजय मिळविला आहे. ब गटातून निवडणूक लढताना त्यांना 90 टक्केपेक्षा जास्त मते मिळाली. ( Ajit Pawars resounding victory in Malegaon factory elections more than 90 percent votes)
ब वर्ग गटातून’02 पैकी 101 मतं वैध होती. यातील अजित पवारांना 91 मतं मिळाली आहेत. सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात. यामध्ये अजित पवारांनी विजय मिळवला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहेत. या साखर कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे आणि शेतकरी संघटना अशी मिळून चार पॅनेल्स मैदानात आहेत.
निवडणुकीला 88.48 टकक्के मतदान झालं होतं. निवडणूक लढवणाऱ्या नव्वद उमेदवारांमधून 21 संचालकांची निवड मतदार आज करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: या निवडणुकीच्या मैदानात आहेत. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवार आणि युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखालील बळीराजा बचाव पॅनेल, चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव पॅनेल आणि शेतकरी संघटांचे कष्टकरी शेतकरी पॅनेल अशी चार पॅनेल्स मैदानात आहेत. पहिल्यांदा मतमोजणी झालेल्या ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात होते, तिथे त्यांचा मोठा विजय झाला आहे.
अ वर्गाची 88.48 टक्के मतदान झाले असून यामध्ये 12 हजार 862 पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. तर 4 हजार 434 स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 19 हजार 549 पैकी एकूण 17 हजार 296 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. तर ब प्रवर्गात 99.02 टक्के मतदान झाले आहे. 102 मतदारांनीपैकी यामध्ये 99 पुरुष आणि 2 स्त्रियांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
