विशेष प्रतिनिधी
पुणे : दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जाताना मटण खाऊन जातात, तुम्हाला सगळयांना माहीत आहे ते घर कोणतं आहे ! असा आरोप करत भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे. Gopichand Padalkar targets Pawar family for eating mutton while going to visit Dagdusheth Ganpati)
सांगलीतील ऋतुजा पाटील हत्या प्रकरणी पुण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनानॆ मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये भाषण करत असताना गोपीचंद पडळकरांनी पवार कुटुंबीयांवर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, संकष्टीचा दिवस असतो तेव्हा उपवास असतो, मात्र तेव्हा हे कुटुंब घरामध्ये मटण आणायचे. एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे. एका गटाची लोकं या मोर्च्यात पुढं पुढं करत आहेत, ते घर पण तसंच आहे. हे घरं असं की दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जाताना मटण खाऊन जातात, तुम्हाला सगळयांना माहीत आहे ते घर कोणतं आहे ! तिची सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे आणि आई कोणी आहे असं ते कॉकटेल घर आहे.
