स्टॉक मार्केटमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवून १६ लाखांची फसवणूक

पुणे: व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करून आणि एका पोर्टलवर गुंतवणूक करण्यास सांगून एका व्यक्तीची स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली १६ लाख ३६ हजार ९६५ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना १५ जून ते ८ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पिंपळे सौदागर येथे घडली.
( Stock Market Scam Man Duped of ₹16 Lakh Through WhatsApp Group)
या प्रकरणी पोत्तम रबी नारायण पात्रो (४२, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ३६० वन अल्टरनेट ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीची कर्मचारी आरोही पटेल, व्हॉट्सॲप ग्रुपचे ॲडमीन, वेब पोर्टल धारक, बँक खाते धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोही पटेल नावाच्या व्यक्तीने व्हॉट्सॲपवर संपर्क साधून फिर्यादीला एका ग्रुपमध्ये ॲड केले. त्यांना स्टॉक मार्केटींगची माहिती देऊन गुंतवणुकीवर खूप जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी फिर्यादीला एका वेब पोर्टलवर अकाऊंट उघडायला लावले व वेगवेगळ्या अकाऊंट नंबरवर एकूण १६ लाख ३६ हजार ९६५ रुपये गुंतवण्यास भाग पाडले. ही रक्कम परत काढण्याचा प्रयत्न केला असता, आयपीओ मधील ३८ लाख १० हजार ८४६ रुपये रक्कम परत भरावी लागेल असे सांगून आणखी पैशांची मागणी केली व फिर्यादीची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *