पोलीस कर्मचाऱ्याला तरुणाकडून मारहाण

विशेष प्रतिनिधी

पुणे : पोलिसांच्या डायल ११२ या क्रमांकावर मदतीसाठी फोन आल्याने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना खराडी येथील उज्जीवन बँक, जयस्वाल वाईन्सजवळ २५ सप्टेंबर रोजी घडली.
( Police officer beaten up by youth)

अक्षय अंगद लंगोटे (वय २८, रा. थिटेवस्ती, खराडी) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार अमोल बबन जाधव यांनी फिर्याद दिली आहे. जाधव हे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक २ मध्ये क्राईम मार्शलवर नेमणुकीस आहेत. ते गस्तीवर असताना डायल ११२ वरील कॉल प्राप्त झाला. घटनास्थळी मदतीकरिता गेल्यानंतर आरोपी एका महिलेला शिवीगाळ करीत असल्याचे त्यांनी पाहिले. फिर्यादीने आरोपीला शिवीगाळ करू नकोस असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने फिर्यादीच्या थोबाडात मारली. त्यांची गचांडी धरून शासकिय गणवेश फाडला. त्यांच्यासोबत असलेल्या होमगार्डसह मदतीसाठी आलेल्या अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत शासकिय कामात अडथळा निर्माण केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *