कार खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; भोर-महाड मार्गावरील शिरगाव हद्दीतील घटना

विशेष प्रतिनिधी

पुणे : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील शिरगाव (ता.भोर) हद्दीत रस्त्यावरील मोरी टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून कारचा अपघात झाला. रविवारी (दि. २९) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात एकाचा मृत्यू तर एकजण जखमी झाला आहे. ( One dies after car falls into a ditch Incident in Shirgaon area on Bhor-Mahad road)
राहुल विश्वास पानसरे (वय ४५ रा.मुंबई) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर राहुल देवराम मुटकुले (वय ३२) हे जखमी आहेत. कारमध्ये दोघेच प्रवास करत होते. ते गणपतीपुळे येथे जात होते. पानसरे यांचा मृतदेह भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. तर जखमी मुटकुले सिव्हिल हॉस्पिटल ( महाड जि.रायगड) येथे उपचारासाठी दाखल केले आहे. भोर पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *