निलेश घायवळच्या घरात सापडला ‘ॲम्युनिशन बाॅक्स’; पोलिसांकडून खडकीतील दारूगोळा कारखान्यातील अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार

विशेष प्रतिनिधी

पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी गुंड नीलेश घायवळ याच्या कोथरूडमधील घराच्या झडतीत काडतुसे, तसेच पुंगळ्यांसह काडतुसे ठेवण्याचे लाकडी खोके (ॲम्युनिशन बाॅक्स) सापडले आहे. खडकीतील लष्कराच्या दारूगोळा कारखान्यातील हे खोके घायवळपर्यंत कसे पोहाेचले? यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
( Ammunition box found in Nilesh Ghaywals house Police correspond with officials at Khadki ammunition factory)

याबाबत पोलिसांकडून दारूगोळा कारखान्यातील अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात घायवळ याच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घायवळ सध्या युराेपात असून, त्याच्या प्रत्यार्पणासाठी पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संस्थेशी (इंटरपोल) संपर्क साधण्यात आला आहे. घायवळला पकडण्यासाठी ‘ब्ल्यू काॅर्नर’ नोटीस बजाविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *