शिवाजीनगर येथे १८ वर्षीय तरुणाला पिटबुल श्वानाने घेतला चावा; मालकावर गुन्हा दाखल

डीसीएन न्यूज नेटवर्क

पुणे: शिवाजीनगर परिसरात एका १८ वर्षीय तरुणाला पिटबुल जातीच्या श्वानाने चावा घेतला. याप्रकरणी श्वान मालकाविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका १८ वर्षीय तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय शेलार (वय ३०, रा. शिवाजीनगर गावठाण) या श्वान मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( 18-year-old man bitten by pitbull in ShivajinagarCase registered against owner)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २५) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी तरुण समग्र क्रांती युवक मंडळ येथील चिंतामणी बिल्डिंगच्या बाहेरील रस्त्यावरून निघाला होता. तेव्हा शेलार यांच्या मालकीच्या पिटबुल जातीच्या श्वानाने फिर्यादी तरुणाच्या डाव्या पायाच्या पोटरीचा चावा घेतला. फिर्यादी तरुणाच्या पोटरीला जखम झाली. दरम्यान, पिटबुल जातीचा कुत्रा पाळून त्याला मोकळा सोडला. तसेच दुसऱ्याला दुखापत होऊ नये याची काळजी घेतली नाही, म्हणून शेलार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९१ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *