डीसीएन न्यूज नेटवर्क
पुणे : कोरेगाव पार्क येथील बिझनेस प्लाझा एव्ह्येन्यू येथील ‘मिलेनियम ग्रॅण्ड स्पा’मध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने पर्दाफाश केला असून आठ पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( Sex Racket Busted at Millennium Grand Spa in Koregaon Park)
फरमान रहमत अली (वय २४, रा. जमुनामुख, जि. नागाव, आसाम), शाहरुख (पूर्ण नाव पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आरोपींनी ८ पिडीत महिलांना पैशांचे आमिष दाखवित वेश्या व्यवसायाकरीता प्रवृत्त केले. मसाज सेंटर (स्पा) च्या नावाखाली त्यांच्याकडून वैश्याव्यवसाय करवू. घेत त्यातून आलेल्या रकमेमधून स्वतःची उपजिवीका भागविली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संगिता जाधव करीत आहेत.
