बंडगार्डन मेट्रो स्टेशनजवळ भीषण अपघात , दोन जागीच ठार तर एक गंभीर जखमी

डीसीएन न्यूज नेटवर्क

पुणे : कोरेगाव पार्क येथील बंडगार्डन मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात पहाटे पाचच्या सुमारास घडला.
( Fatal accident near Bundgarden Metro Station two killed on the spot one seriously injured)

हृतिक भंडारे (25) आणि यश भंडारे (दोघेही रा. पिंपरी चिंचवड) अशी मृतांची नावे आहेत. तर, जखमी तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. हे तिघेही एका कारमधून जात होते. त्यांची मोटार भरधाव होती. त्यावेळी त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. मेट्रो स्टेशन जवळ त्यांची गाडी उलटली. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला. यात दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. बचावकार्य राबवित जखमींना ससून रुग्णालयात दाखल केले. दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर, तिसऱ्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *