महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वजनदार नेते आहेत. सर्वात तरुण वयात महापौर झालेल्या फडणवीसांनी राजकारण आणि पक्ष पातळीवर वेगवेगळ्या भुमिकांना न्याय देत मुख्यमंत्री पद पटकावले. राजकीय घडामोडीनंतर त्यांना पुरेसे संख्याबळ असताना विरोधी पक्षात बसावे लागले. पण त्यावर मात करत त्यांनी पुन्हा सत्ता मिळवली आज त्यांचा 53 वा वाढदिवस.या निमित्ताने पाहूया त्यांचा प्रवास.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी झाला. 2014 च्या निवडणुकीनंतर वयाच्या 44 व्या वर्षी मुख्यमंत्रीपद भूषवणारे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. 2019 मध्ये सरकार स्थापन करून कमी काळासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद झाली आहे. संघ परिवाराच्या संस्कारात त्यांची वाढ झाली. भाजपमध्ये अगदी छोट्या पदापासून सुरुवात करून त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारली.देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात सुरुवात 90 च्या दशकात झाली आहे साल होतं 1989… देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये सक्रीय झाले होते. त्यांच्यावर भाजप युवा मोर्चाच्या वॉर्ड अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पुढे 1990 साली ते नागपूर शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी देण्यात आली.
1992 ला देवेंद्र फडणवीस हे भाजप युवा मोर्चाचे नागपूर शहर अध्यक्ष झाले. 1992 ते 2001 या काळात ते नागपूरचे महापौर झाले. सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य म्हणून निवडून आले. तसंच सर्वात तरूण महापौर होण्याचा बहुमानही फडणवीस यांच्याच नावावर आहे.नंतर पुढे दोन वर्षात 1994 ला फडणवीस भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष झाले. 1999 साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.2001 साली देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. 2010 ला भाजपच्या प्रदेश सरचिटणीसपदाचीही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली.2013 हे साल देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरलं. कारण याच काळात त्यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. तेव्हा त्यांच्या डोळ्यापुढे 2014 च्या निवडणुका होत्या. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वगुणांचा विस्तार झाला. तेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या लक्षात आलं. त्यामुळे महाराष्ट्रातील दिग्गज मंडळींना मागे सारत देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांजा राज्याचे मुख्यमंत्री झाले. यावेळी ते 44 वर्षांचे होते.
2019 ला शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्यण घेतला. पुढे हे सरकार केवळ औट घटकेचं ठरलं. 80 तासात हे सरकार पडलं. विशेष योगायोग म्हणजे अजित पवार यांचाही आज वाढदिवस आहे.2014 आणि 2019 या दोन वेळा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. सध्या शिंदे सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री आहेत.
