औरंग्याला बाप म्हणणाऱ्यांनी पाकिस्तानात निघून जावे; विधानसभेत नितेश राणे आक्रमक

औरंगजेबाच स्टेटस ठेवण्याच्या मुद्यावरुन आमदार नितेश राणे आज सभागृहात चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी या विषयावर सभागृहात काही मागण्या केल्या आहेत. मध्यंतरी औरंगजेबाच स्टेटस ठेवण्याच्या मुद्यावरुन राज्याच्या काही भागात जातीय तणाव निर्माण झाला होता. आज नितेश राणे यांनी यावरुन सभागृहात आक्रमक भाषण केलं. यावेळी सभागृहात विरोधकांचा गोंधळ सुरु होता. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराजाच्या राज्यात औरंगजेबाच स्टेटस ठेवले जातं. ज्या औरंग्याने छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांविरुद्ध कटकारस्थान रचले,जो स्वराज्याचा एक नंबरचा शत्रू होता. त्याच औरंग्याच स्टेटस ठेवून राज्यातील वातावरण खराब करण्याचे काम केले जात आहे, असे नितेश राणे म्हणाले.

नितेश राणे म्हणाले वंदे मातरम म्हणणार नाही, असे काही लोकप्रतिनिधी जाहीरपणे सांगत असून शिवरायांच्या भूमित औरंगजेबचा गौरव करत आहेत. औरंगजेबाचे स्टेट्स ठेवणारी मुली कोण, त्यांचा ‘मास्टरमाइंड’ कोण, याच्या शोधासाठी ‘एसआयटी’ स्थापन करणार आहात का? तसेच अशा लोकांना काही पोलीस प्रशासनातील काही मंडली मदत करत आहेत. योग्य वेळी या प्रकरणांचा तपास न करता संबंधितांना मदत करतात. या पोलीस अधिकाऱ्यांची खात्याअंतर्गत चौकशी होईल का? असे दोन प्रश्न राणेंनी लक्षवेधीत मांडले. औरंग्या बाप आहे अशा घोषणा देऊन राज्यातील वातावरण खराब केल जातय. यांना शिवरायांच्या राज्यात राहण्याचा अधिकार नाही. पाकिस्तानात निघून जा. कशाला इथे राहता? अशी आक्रमक भाषा नितेश राणे यांनी वापरली.

नितेश राणे यांच्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. देशावर आक्रमण करणारा औरंगजेब कुणाचाही नेता होऊ शकत नाही. तो तर्किक मंगोल असल्याने भारातील मुस्लिमाचाही हिरो होऊ शकत नाही. त्यामुळे जाणीवपूर्वत स्टेट्स ठेवून, त्याचा फोटो घेऊन उदात्तीकरण करणे असे यापू्र्वी कधीही झालेले नाही. यामुळे दोन समुदायात तेढ निर्माण करणाऱ्याविरोधांत कारवाई करणे गरजेचे आहे. याबाबत काही धागेदोरे हाती लागले असून या प्रकरणाच्या खोलापर्यंत तपास सुरू आहे. सध्या एटीएस स्थापन केली नसली तरी आयबी आणि सीबीआय तपास करत आहे. अशी माहिती यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.