शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर कोट्यवधी रुपयांचा खर्च केवळ जाहिरातीवर होत असून हा खर्च टाळून सर्वसमान्यांसाठी कुठली योजना राबवता आली नसती का, असा प्रश्न उपस्थित करणारी पोस्ट सोशल मिडियाच्या मध्यमातून केली. यावर आता भाजप खा.सुजय विखे यांनी सरकारने कामच एव्हढे केल आहे की उलट अजून जाहिराती वाढवायला हव्यात, काही लोकप्रतिनिधींना काम कमी आणि जाहिरात जास्त करायला आवडते, असे म्हणत खा. सुजय विखे यांनी नाव न घेता आ.रोहित पवारांना टोला लगावला.
काम नसताना जाहिरात करणे असे जे काही लोक करतात त्यांना अशी भावना येणे स्वाभाविक आहे. असे अनेक लोक आहे, असे अनेक युवा लोकप्रतिनिधी आहे जे की काम कमी व जाहिरात जास्त करतात. मुळातच राज्य सरकारमध्ये काम एवढं जास्त झालं आहे की जाहिराती कमी होत आहेत यासाठी जाहिराती वाढवल्या पाहिजे. जेणेकरून झालेली कामे जनतेपर्यंत अजून जास्तपर्यंत पोहचतील असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले आहे.
मोबाईल मुळे शांतता बिघडत असल्याचे हि यावेळी सुजय विखे म्हणाले, सामाजिक शांतता बिघडणे हे समाजासाठी घातक आहे. त्यासाठी मोबाइलवर बंदी आणण्यासाठी काहीतरी कायदा केला पाहिजे. कुणीही काहीही मेसेज टाकतो. कुणाच्या भावना दुखविल्या जातात. भावना दुखविणारे वेगळेच असतात. तोडफोड करणारे वेगळेच असतात. तर आरोपी हे वेगळेच असतात. हे वातावरण समाजासाठी अधिक घातक आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी आई-वडिलांनी आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे.
अहमदनगरमधील अमृत भारत योजनेच्या पायाभरणी समारंभानंतर माध्यमांशी बोलताना सुजय विखेंनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. विखे म्हणाले, “या अधिवेशनात रोहित पवारच तर सर्वात जास्त बोलले आहेत. एवढे बोलले की जरा अजून बोलले असते त्यांनाच स्पीकरच्या जागेवर बसवावे लागले असते. संपूर्ण अधिवेशनात त्यांनीच कॅमेऱ्याचे लक्ष वेधले होते. यामुळे युवा आमदारांना संधी मिळत नाही हे म्हणणे चुकीचे आहे,” असेही खासदार विखेंनी सांगितले.
