महिलांच्या सक्षमिकरणासाठी सरकारमार्फत सातत्याने नवनवीन योजना जाहीर केल्या जातात. केंद्र सरकारमार्फत पहिल्या आपत्यासाठी ५ हजार रुपये दिले जातात. अशात आता पंतप्रधान मातृवंदना योजना २ जाहीर करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने या योजनेची घोषणा केली आहे. यानुसार महिलेला दुसरे आपत्या मुलगी झाल्यास ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. स्त्री भ्रूणहत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता ते रोखण्यासाठी सरकारने या योजनेची घोषणा केली आहे. अनेक गावांत खेयड्यापाड्यांत आणि शहरांमध्येही बऱ्याच ठिकाणी मुलगाच हवा अशी मागणी असते. यासाठी अवैधरित्या गर्भ तपासणी देखील केली जाते. अशा अनेक दवाखाण्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कन्यारत्न प्राप्त झाल्यास मुलीच्या कुटुंबीयांना ६ हजारांची रोख रक्कम देण्यात येणार आहे.
कुणाला मिळेल लाभ? –
- ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रति वर्ष आठ लाख रुपयेपेक्षा कमी आहे तसेच किमान १८ वर्षे व कमाल ५५ वर्षे वय असलेल्या महिलांसाठी योजना असेल.
- दुसरे अपत्य जुळे झाले आणि त्यात दोन्ही मुली असतील किंवा एक मुलगी एक मुलगा झाला तरी एकाच मुलीसाठी लाभ दिला जाईल.
सोलापूर विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेंतर्गत पहिली फेरी ७ ते १२ ऑगस्ट २०२३, दुसरी फेरी ११ ते १६ सप्टेंबर २०२३ या कालावधीत जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आलेली असून तिसरी फेरी, दिनांक ९ ते १४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली.याअंतर्गत नियमित लसीकरण सत्राचे आयोजन निश्चित केलेल्या दिवशी सुरू आहे. अतिरिक्त सत्राचे नियोजन हे नियमित लसीकरण सत्राचा दिवस वगळून इतर दिवशी अति जोखमीच्या भागात करण्यात येत आहे. झीरो ते दोन वर्षे वयोगटातील लसीकरणापासून वंचित सांगितले.
किंवा गळती झालेले लाभार्थी, दोन ते पाच वयोगटातील ज्या बालकांचे गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला आहे. तसेच डीपीटी व ओरल लसीचा डोस राहिलेले लाभार्थी, गर्भवती महिला यांना लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या लसीद्वारे लसीकरण करणे, ६ ऑगस्ट २०१८ किंवा त्यानंतर जन्मलेला बालकाचा या मोहिमेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला तुम्ही भेट देऊ शकता. योजनेची संपूर्ण माहिती यावर तुम्हाला मिळेल. येथे देण्यात आलेला फॉर्म भरल्यानंतर संबंधित कागदपत्रे जोडून योजनेसाठी अर्ज करता येईल आणि लाभ घेता येईल.
