समाजवाद्यांशी युती हा उद्धव ठाकरेंचा स्वतःला संपवण्याचा शेवटचा डाव – नितेश राणे

जेवढे काँग्रेसचे लोक सोनिया आणि राहुल गांधींचे गोडवे गात नाहीत तेवढे संजय राऊत हे समाजवाद्यांच्या प्रेमात पडलेले आहे. समाजवाद्यांशी युती करुन उद्धव ठाकरेंनी स्वतःला संपवण्याचा शेवटचा डाव टाकला आहे. येणार्‍या निवडणुकीनंतर उबाठा नावाची संघटना अस्तित्वात राहणार नाही, याची काळजी या दोघांनी घेतलेली आहे, असा टोला नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

नितेश राणे म्हणाले, मी जे वारंवार बोलतो की उद्धव ठाकरे हा महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्यात अग्रेसर आहे. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा दंगल घडली आहे तेव्हा तेव्हा मी उद्धव ठाकरेंच्या नार्कोटेस्टची मागणी केली आहे. तेव्हा नीलम गो-हे, मिलिंद नार्वेकर म्हणजे कोण तर उद्धव ठाकरे. मिलिंद नार्वेकर हे उद्धवजींचे आजही खासगी सचिव आहेत. आणि या दोघांनाही उद्धव ठाकरेंचेच आदेश होते की तुम्ही महाराष्ट्रात दंगल घडवा. माजी पोलीस कमिशनर स्वतः हे सांगत आहेत, त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे.पुढे ते म्हणाले, राम मंदिर उद्धाटनाप्रसंगी देशामध्ये दंगली होतील असं आतापासून कोण भाषण करतंय? तर उद्धव ठाकरे. राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था भडकवण्याचं काम त्याने केलं आहे. राज्यात गेल्या दीड-दोन वर्षांपासून ज्या दंगली झाल्या किंवा उद्या राम मंदिराच्या दिशेने जाणार्‍या रामभक्तांना कुठल्याही प्रकारे गालबोट लागलं तर त्याला जबाबदार हा उद्धव ठाकरे असणार कारण आतापासून तो दंगलीची भाषा करतोय.

संजय राऊत तुझं वेळ पत्र ठरलेलं आहे. तुझ्या घरातील एक माणूस आणि तू दिवाळीत जेलमध्ये जाणार आहे. हिंमत असेल 24 तासासाठी संरक्षण सोड. मग जुने शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ते तुझे कपडे काढून गाढवावरून तुझी धिंड काढतील. ज्याला बाळासाहेब कळले नाहीत. ज्यांच्यासोबत बाळासाहेबांनी युती केली नाही. त्यांचे गोडवे आता राऊत गात आहे. त्यांच्या प्रेमात पडला आहे. येणाऱ्या निवडणुकीनंतर ठाकरे गट नावाची सेना शिल्लक राहणार नाही, असा घणाघातही नितेश राणे यांनी केला आहे.

समाजवादी विचार किती प्रभावी आहेत हे रोज संजय राऊत टेपरेकॉर्डर लावल्यासारखा सांगत राहतो. ज्याला मुळात बाळासाहेबच कधी कळले नाहीत, ज्याने कधी मुळापासून बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांची जडणघडणच पाहिली नाही, ज्या जॉर्ज फर्नांडिस आणि मृणाल गोरेंनी बाळासाहेबांसोबत युती करणं टाळलं त्याच्याबद्दलच संजय राऊत आज गोडवे गाताना दिसतोय. जेवढं काँग्रेसचे लोक सोनिया आणि राहुल गांधींचे गोडवे गात नाहीत तेवढा हा समाजवाद्यांच्या प्रेमात पडलेला आहे. समाजवाद्यांशी युती करुन उद्धव ठाकरेंनी स्वतःला संपवण्याचा शेवटचा डाव टाकला आहे. येणार्‍या निवडणुकीनंतर उबाठा नावाची संघटना अस्तित्वात राहणार नाही, याची काळजी या दोघांनी घेतलेली आहे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.