भारताची गुप्त माहिती पाकिस्तानच्या इंटेलिजन्सला दिली, तरुणाला ठाण्यातून अटक

ठाण्यातून एका इसमाने भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित प्रकरण उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ठाणे एटीएसने पाकिस्तानच्या इंटेलिजन्सला गोपनीय माहिती देणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीने हे कृत्य का केलं? त्याच्यासोबत आणखी कुणाचा या प्रकरणात समावेश आहे का? त्याने इतकं मोठं धाडस का केलं? तो देखील पाकिस्तानच्या इंटेलिजन्सला जावून मिळाला आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. महाराष्ट्र एटीएस याप्रकरणी आता चौकशी करत आहे.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ठाण्यातून अटक केलेल्या तरुणाचे नाव गौरव पाटील असे आहे. 23 वर्षीय गौरव पाटील नोवल डॉक येथे कामाला होता. गौरव मागील चार ते पाच महिन्यांपासून पाकिस्तानी गुप्तहेराच्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्कात होता. त्याने माहितीच्या बदल्यात ऑनलाईन पैसे स्विकारल्याचेही एटीएसने सांगितलेय. गौरव पाटीलशिवाय अन्य तीन जणांच्याही पाकिस्तानचा गुप्तहेर संपर्कात होता. एटीएसने चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांना पुरवल्याची माहिती सातत्याने चर्चेत येत असते. काही महिन्यांपूर्वी पुण्यातून अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली होती. डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर हे हनीट्रॅपमध्ये अडकले होते. त्यांनी व्हाट्सॲप आणि व्हॉईस मेसेजद्वारे पाकिस्तानशी संपर्क ठेवल्याची माहिती समोर आलेली. यातून त्यांनी अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिली होती, अशी माहिती समोर आली होती.

संसद घुसखोरी प्रकरणात 6 जणांचा समावेश असल्याचं समोर आलंय. यातील 4 जणांना अटक करण्यात आलीय तर 2 जण फरार आहे. त्यांचा तपास यंत्रणांकडून शोध घेतला जातोय. विशेष म्हणजे यातील एक आरोपी मनोरंजन हा गेल्या 6 महिन्यांपासून संसदभवन परिसरात पासेस मिळवण्यासाठी फे-या मारत होता. आता या सगळ्या आरोपींचा घुसखोरीमागचा नेमका उद्देश काय होता, याचा शोध पोलीस घेतायेत. अटक करण्यात आलेले चारही आरोपी गुरूग्रामच्या सेक्टर 7 मधील हाऊसिंग बोर्डात थांबले होते. या प्रकरणात हिस्सारमधील विक्की शर्मा आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आलीय. चौघेही विक्का शर्माच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येतीय.