संस्कार जीवित राहतील तर संस्कृति जीवित राहिल, आणि जर संस्कृति जावित राहिल तर संपूर्ण सभ्यता जीवित राहिल, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ठाणे येथे श्रीमद भागवत कथा यज्ञ आयोजित करण्यात आला आहे, त्यावेळी ते बोलत होते. आपली सभ्यता जीवंत ठेवण्याचे काम आपल्या साधू संतांनी केले आहे, आणि त्यामुळेच मोठ मोठे आंक्रांता आले, त्यांनी आक्रमण केले, तरी सुद्धा आपली सभ्यता अजून जीवंत आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

जेव्हा संस्कार समाप्त होतात, आपली संस्कृति आणि सभ्यता संपते, आपल्या देशातील साधु संतांनी आपल्या संस्कार आणि संस्कृतिला कधीच संपू दिले नाही. जगातील इतर सभ्यता संपल्या मात्र आपली सनातन संस्कृति जीवंत आहे. सनातन संस्कृति जगातील सगळ्यात प्राचीन संस्कृति आहे. असेही ते यावेळी म्हणाले.
“आजवर आपल्या देशावर जितकेही आक्रमण झाले आहे, सर्व आक्रांतांनी आपली अस्मिता संपवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे हे आक्रमण आपल्या मंदिरांवर झाले, आपल्या विश्वविद्यालयांवर झाले, कारण त्यांना माहीत होते, जोवर या देशात सनातन ज्ञान आहे, जोवर या देशातील लोकांची श्रद्धा त्यांच्या देवांवर आहे, तोवर या देशाला गुलाम नाही करता येणार. मात्र मंदिर तोडून देखील ते आपल्या संस्कृतिला नष्ट करण्यात अयशस्वी झाले, कारण आपल्या देशातील साधू संतांनी देशाच्या नागरिकांच्या मनात मंदिर तयार केले आहे.” अशा भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
