निवडणूक आयाेगाला विनंती करणार  ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचे विलिनीकरण करून    ‘खंजीर’   चिन्ह द्या, गाेपीचंद पडळकर यांची टीका 

बारामती : निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्ह देऊन चूक केली आहे.  ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचे विलिनीकरण करून  त्यांना एकित्रत  ‘खंजीर’ हे चिन्ह द्यायला पाहिजे होते,  अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी बारामतीत पत्रकारांशी बाेलताना केली.


 ठाकरे गटाला ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि ‘मशाल’ हे चिन्ह  तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ‘ढाल-तलवार’ हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी आयोगाला पत्र लिहिलं आहे. आमच्याबरोबर दुजाभाव केला जात असल्याचे त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्राबाबत विचारले असता गोपीचंद पडळकर म्हणाले, “उद्धव ठाकरेंबरोबर कसला दुजाभाव केला आहे? खरं तर, निवडणूक आयोगाकडे आम्हीच विनंती करायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांचे विलीनीकरण करून त्यांना ‘खंजीर’ चिन्ह द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांना लोकांमध्ये सहजपणे जाता येईल. कारण ‘मशाल’ चिन्ह रुजवायला त्यांना वेळ लागेल. ‘खंजीर’ म्हटलं तर लोकांच्या लगेच लक्षात आलं असतं.
“मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच खंजीरातून झाला आहे. आता पवारांनी नवीन एक खंजीर घुसवणारा निर्माण केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडूनच चूक झाली, असं मला वाटतंय. मी स्वत: एक पत्र लिहून विनंती करतो की, त्यांचं चिन्ह बदलून त्यांना ‘खंजीर’ चिन्ह द्या. पण तुम्हाला खंजीर चिन्ह मिळाल्यानंतर ते एकमेकांच्यात घुसवू नका, समोरच्यात घुसवा.