भाजप आणि शिंदेंसोबत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाडांचा पुढाकार होता, असा गौप्यस्फोट वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी केला आहे. तर आव्हाडांना पक्षात कोणीही विचारत नाही,अशी टीका देखील मुश्रीफांनी यावेळी केली आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी होते. एकाकी पडल्यामुळे आव्हाड भ्रमिष्ट झाल्याचे देखील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
आमची सत्ता पहिल्यांदा गेली तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांच्यासोबत जावं यासाठी जितेंद्र आव्हाड आणि पुढाकार घेतला होता. यावेळी आमदारांनी सह्या केल्या त्यामध्ये जितेंद्र आव्हाडांची सही एक नंबरला होती, असा दावाही मुश्रीफ यांनी केला.आम्ही भाजपसोबत जाणार त्यावेळीच्या चर्चेत जितेंद्र आव्हाड नव्हतेच. माझा भाजपसोबत जायच्या निर्णयाला विरोध असता तर मी मंत्रीपदाची शपथ घेतली असती का? असा सवालही हसन मुश्रीफ यांनी यावेळी उपस्थित केला.
या पूर्वी भाजप सोबत जाण्यासाठी वरिष्ठांनी अनेक वेळा निर्णय घेतला मात्र ते शक्य झाले नाही. मात्र आता अजितदादांना एकाकी पडू द्यायचे नव्हते. त्यामुळे आम्ही मनापासून अजित दादांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि मंत्री मंडळात सामील झालो. परवा ते म्हणाले की सर्वजण कमळावरती लढतील आरएसएस ची बैठक झाली आहे. सगळं काही यालाच कळतं का? ते त्यांच्या पक्षात एकाकी पडले आहेत त्यांना कोणी विचारत नाही. यामुळे ते सध्या भरमिष्ट अवस्थेत असल्याचे मुश्रीफ म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे जितेंद्र आव्हड यांनी मंत्री हसन मुश्रीफांवर निशाणा साधला होता. जितेंद्र आव्हाड म्हणाले, हसन मुश्रीफ यांना विचारा कोणत्या तीन पक्षात भांडण लावण्याच काम केलं. हसन मुश्रीफ यांच्यासोबत मी दहा मिनिटं तरी कधी बोललो असेल तर त्यांनी सांगावे,जेव्हा भाजप सोबत जाण्याचा हे विचार करत असतांना या हसन मुश्रीफ यांनी सर्वात आधी मला कॉल केला होता. जितेंद्र हे थांबवायला हवं,बोलायला आणि काढायला गेलो तर मी पण खूप काढू शकतो.
