उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी एकनाथ शिंदेंच्या मार्फत एक कोटींची देणगी दिली – नितेश राणे

रामलल्लाच्या मंदिरासाठी जर कोणी मोठे दान दिलं असेल, तर ते शिवसेनेने दिलं आहे. शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांनी २०१९ साली सर्वात आधी राम मंदिरासाठी १ कोटी रुपयांची देणगी दिली होती, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राम मंदिरासाठी एक कोटी रुपयांची देणगी कुणी दिली? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या मार्फत उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी एक कोटींची देणगी दिल्याचं नितेश राणे म्हणाले. ते मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यांचाही समाचार घेतला. मिमिक्रीचे समर्थन करणारे म्याऊ म्याऊचे समर्थन करणार का? असे म्हणत नितेश राणेंचा संजय राऊत यांना उलट सवाल केला. ठाकरेंना फक्त निवडणुकांपूर्वी रामाची आठवण येते. चायनीज मॉडेल हिंदू म्हणत राणेंनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना टोला लगावला.

दरम्यान, अयोध्येचा सातबारा हा रामाच्या नावावरती आहे. भाजपच्या नावावरती नाही. रामल्लाची मालकी यांच्याकडेच आहे अशा प्रकारे ते (भाजप) मते मागतता, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता. यावर बोलताना अयोध्येचा सातबारा हा कडवड हिंदूंचा अधिकार असून सातबाऱ्यावर समस्त हिंदूचं नाव आहे, तुमच्यासारख्या चायनिस मॉडेल हिंदूंचा नाही, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.

राम मंदिरासाठी देणगी सर्वात आधी उद्धव ठाकरेंनी दिली आम्ही ऐकलं की ती देणगी एकनाथ शिंदे यांच्याकडून घेऊन दिलेली आहे. हे खरं आहे की खोटं आहे. 1 कोटी हे एकनाथ शिंदे यांचे आहेत की उद्धव ठाकरेंच्या खिशातले आहेत. याचे आधी उत्तर द्यावे मगच देणगी बाबत बोलावे, असे नितेश राणे म्हणाले.