गृहमंत्री अमरावती मध्ये येत असताना मॅच्युरिटीने वागायला हवे; नवनीत राणांचा बच्चू कडूंना टोला

लोकसभा निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शहा हे अमरावतीत येणार आहेत. दरम्यान, अमरावतीत सभेसाठी मैदानावरून मोठा वाद झाल्याचं दिसून आलं. प्रहारचे बच्चू कडू यांनी आपल्याला दिलेली परवानगी ऐनवेळी नाकारल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. ही दडपशाही असून केवळ शांतता रहावी यासाठी आपण माघार घेतल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं. आता नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केलीय. गृहमंत्री अमरावती मध्ये येत असताना मॅच्युरिटीने वागायला हवे, यात कोणाला सांगण्यासारखे नाही. मैदानाची आम्ही आधीच परवानगी मागितली होती त्यानुसार आम्हाला मैदान मिळाले असं राणा यांनी स्पष्ट केलं.

आज अमरावतीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा होत आहे. त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर नवनीत राणा म्हणाल्या की, राहुल गांधीची सभा अमरावती होतेय, त्याचा मला अभिमान वाटतो. पाचवर्ष ज्या पद्धतीने काम केलं, जनतेची सेवा केली, त्यामुळे देशातील नेत्यांना नवनीन राणाला पराभूत करण्यासाठी इथे याव लागतय. याचा अभिमान वाटतो. माझी अमरावती कशी आहे? हे त्यांनी पाहाव.

पैशाच आमिष दिल्याचा आरोप बच्चू कडू यांनी तुमच्यावर केलाय. त्यावरही नवनीत राणा यांनी उत्तर दिलं. बच्चू भाऊ माझ्यापेक्षा खूप मोठे, सिनिअर आहेत. त्यांचा अनुभव ते जाहीर करतायत. जास्त काही बोलणार नाही. माझा लक्ष्य माझा मतदारसंघ आहे असं नवनीत राणा म्हणाल्या. प्रतिसाद कसा मिळतोय? त्यावर त्यांनी सांगितलं की, देशामध्ये मोदींची हवा आहे. अमरावतीकर महिला, जनता माझ्या पाठिशी आहे. मला जास्त विचार करण्याची गरज नाही, मोदीजींची हवा होती आणि राहणार”

जास्तीत जास्त मतदान व्हायला पाहिजे एका मताने फरक पडतो त्यामुळे देशहितासाठी मतदान करावे. उघड्या डोळ्याने राहुल गांधी पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत आहे, ते पूर्ण होणार नाही, राहुल गांधींची कधीच मोदींच्यासोबत तुलना होऊ शकत नाही. माझी हट्रिक होणार का हे मतदार ठरवतील. मी प्रचार पातळी सोडून करत नाही, संस्कृती जपत प्रचार केला असंही नवनीत राणा यांनी सांगितलं.