नारायण राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत सभा घेणार

गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आणि त्यानंतर राज्याच राजकारण वेगळ्याच दिशेला गेल. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भर सभेत कौतुक करून एनडीए सह महायुतीला पाठिंबा दिला आणि महायुतीच्या प्रचार सभेत मनसे नेते सहभागी होत गेले. लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांचे मतदान पूर्ण झालेय. आता तिसऱ्या टप्प्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे चित्र दिसत आहेत.

काही वर्षांपूर्वी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे नारायण राणे आणि राज ठाकरे हे शिलेदार होते. २००५ साली नारायण राणे यांनी शिवसेनेची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्या पाठोपाठ राज ठाकरे यांनी २००६ मध्ये शिवसेना सोडून मनसे हा नवा पक्ष स्थापन केला. या दोघांचे पक्ष जरी वेगवेगळे असले तरी मैत्री ही कायम होती. २००९ ला राज ठाकरे यांनी लोकसभा स्वतंत्र लढवली आणि त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि तब्बल दहा वर्षानंतर त्यांनी पुन्हा एकदा महायुतीला पाठिंबा दर्शवला आहे.

नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे ४ मे रोजी सिंधुदुर्गाल्या कणकवली येथील उपरुग्णालयाच्या समोरच्या मैदानात सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा घेणार आहे.शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला चढवला आहे. मात्र उद्या होणाऱ्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांच्या विषयी राज ठाकरे काय बोलणार आणि यांच्या सभेनंतर कोकणातल्या मतदारांवर काय प्रभाव पडणार हे पाहणं लक्षवेधी ठरणार आहे.

गेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असलेले राज ठाकरे यावर्षी महायुतीसोबत आहेत. राज ठाकरे वगळता मनसेचे कार्यकर्ते महायुतीला भक्कम पाठिंबा देत असल्याचे दिसते.राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिल्यामुळे महायुतीला अधिक बळ मिळालं आहे. स्पष्टवक्तेपणा आणि मराठी माणसाचा बुलंद आवाज म्हणून राज ठाकरेंची ओळख आहे.६ मे २०२३ रोजी रत्नागिरीत मनसेचा जाहीर मेळावा होता आणि त्यावेळी बारसू रिफायनरी प्रकल्प संदर्भात राज ठाकरे यांनी केलेलं भाषण चांगलंच गाजलं होतं. मुंबई प्रमाणे कोकणातील स्थानिकांना हक्क मिळावा या विषयावर सुध्दा राज ठाकरे यांनी थेट भाष्य केलं आहे.