भारत कृषिप्रधान देश आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त शेती व्यवसाय केला जातो. गेल्या काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी नेहमी अडचणीत सापडलाय. तर कधी-कधी शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी निराश होऊन आत्महत्याच पाऊल उचलतात. सहकार क्षेत्राचा शेतकऱ्यांना आधार मिळावा म्हणून सहकार बँका, सूतगिरण्या, पतसंस्था स्थापित केल्या पण अलीकडच्या काही दशकांत समाजहिताचा उद्देश असलेल्या सहकारी चळवळीला स्वार्थाची, भ्रष्टाचाराची, राजकारण्यांची कीड लागली आणि बघता-बघता याच सहकारी क्षेत्रांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजकारण, समाजकारण, त्यातील उच्च समाज मूल्ये पायाभूत मानून उभ्या राहिलेल्या संस्थांचे अर्थकारण, सारेच उद्ध्वस्त केल्या जातय का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आपले राजकारणी मात्र वेगळी शेती करतात. शेतकऱ्यांचा आणि सहकाराचा पुळका राजकारण्यांना येतो. फुलका हा शब्द यासाठी की तो मनातून नाही कारण राजकारण्यांची शेती करण्याची पद्धत बघितली तर नवलच कारण राजकारणी शेतीतून करोडोचा नफा कमवतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी शेती व्यवसायातून करोडोंचा नफा मिळवलेला आहे. मात्र, नफा कसा मिळवतात हे त्यांनी अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना सांगितलं नाही. त्यांच्या वडिलांना राष्ट्रवादीचे नेते जाणता राजा म्हणून संबोधतात परंतु या जाणत्या राजाने आपल्या मुलीला जो शेतीतून कोट्यवधींच उत्पन्न घेण्याचा कानमंत्र दिला तो मात्र आतापर्यंत शेतकऱ्यांना का दिला नसेल हा प्रश्न सर्व सामान्य शेतकऱ्यांना पडला आहे.
2014 च्या प्रतिज्ञा पत्रानुसार सुप्रिया सुळे यांनी त्यांचा व्यवसाय हा शेती दाखवलेला आहे. याच व्यवसायातून त्यांनी करोडो रुपये कमवल्याची आकडेवारी पुढे येत आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे 55 हजार रुपये नगदी आहेत. तर बँकेमध्ये सहा करोड च्या पुढे जमा आहेत त्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या बॉण्ड व शेअरचे त्यांच्याकडे 28 करोड पेक्षा जास्त पैसे आहेत. तसेच इन्शुरन्सचे त्यांच्याकडे तीन कोटी रुपये आहेत. एवढं सगळं असूनही सुप्रियाताई सुळे यांच्या नावावर एकही वाहन नाही. सोन हे तीन करोडपेक्षा जास्त किमतीच आहे. त्यांच्याकडे अचलसंपत्तीमध्ये शेतजमीन 91 लाख रुपयांची व इतर जमीन आठ लाख रुपयांची तसेच मुंबई येथे रामलया फ्लॅट व सिल्वर ओक व मोदी बाग पुणे येथे एक घर असे एकूण 16 कोटी रुपयांची तीन घरे आहेत. सर्व संपत्ती 113 कोटी रुपयांची आहे असं त्यांनी आपल्या 2014 च्या प्रतिज्ञापत्रात दाखवली आहे.
मग २०१९सालच्या संपत्तीत दुप्पट-तिप्पटीनं वाढ झाली कशी? हा प्रश्न काबाड कष्टकरून शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना पडला आहे. त्यातच सुप्रिया सुळेंचा मुख्य व्यवसाय शेती असल्याचे बोलले जाते. ज्या महाराष्ट्रात वीस-तीस एकर शेती असणारे सुद्धा कर्जबाजारी आहेत कर्जबाजारीपणामुळे त्रस्त आहेत व काही शेतकरी आत्महत्या करत आहेत अशातच फक्त दहा एकर शेतीतून करोडो रुपये घेणारे राजकारणी मात्र या शेतकऱ्यांना आपलं गुपित सांगत नाहीयेत की काळा पैसा पांढरा करायचा म्हणून शेतीचा व्यवसाय दाखवलेला आहे हा एक प्रश्न आहे कारण शेती मधून मिळालेल्या उत्पन्नावर टॅक्स लागत नाही. त्यामुळे शेती हा व्यवसाय दाखवलाय का हा एक प्रश्न आहे?
ज्यांच्या पक्षाने शेतकऱ्यांच्या नावावर नेहमीच राजकारण केले आता तर त्यांनी उत्पन्नात देखील शेतकऱ्यांच्याच नावावर राजकारण केले ह्याच प्रकारचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार का? हा सवाल उत्पन्न होतो.
