विरोधी पक्षांचे काम हे जनता आणि सरकार यांच्यात मध्यस्थीची भूमिका पार पाडण्याचे असते. जनतेच्या ज्या काही अडचणी, मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहचवणे त्या संदर्भात काय उपाय योजना कराव्यात हे काम मुख्यतः विरोधी पक्षाचे असते. सरकार चालवायचे असेल तर विरोधी पक्ष ही तेवढा सक्षम असणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात 2014 नंतर विरोधी पक्ष गायब झाला की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण 2014 नंतर विरोधी पक्ष हा तेवढा सक्षम दिसत नाहीये. विरोधी पक्ष आपलं मूळ काम विसरून आपला पक्ष वाचवणे व आमदार वाचवणे यातच अडकलेला दिसतोय. विरोधी पक्ष हा अधिवेशनाच्या वेळी सरकारकडे जनतेला अपेक्षित अशा प्रश्नांची मागणी करत असतो परंतु महाराष्ट्रात असे होताना दिसत नाही. महाराष्ट्रात विरोधी पक्ष हा फक्त विधानभवनाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी करताना दिसतोय.
2014 ते 19 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात विरोधी पक्ष जणू काही गायब झाला की काय असे वाटत होते यातच 2019 ला शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस व युती करून जनतेच्या मनाविरुद्ध सरकार स्थापन केले जनतेचा खरा कौल हा भाजप शिवसेनेलाच होता व तेच सरकार स्थापन होणे अपेक्षित होते परंतु मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षांसोबत युती केली.
यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी सांभाळी 2019 ते 2022 या कालखंडामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले की विरोधी पक्षनेता व विरोधी पक्ष नेत्याची भूमिका काय असते ते जनतेचे सर्व प्रश्न निर्भीडपणे विधानभवनात मांडणे प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा करणे व जनतेच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र पिंजून काढणे व ते सरकारला दाखवून देणे व त्यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारला भाग पाडणे. सर्व देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते असताना दाखवून दिले.
अशातच शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले व त्यानंतर झालेल्या अधिवेशनात विरोधी पक्ष नेत्यांनी किंवा विरोधी पक्षातील नेत्यांनी फक्त आणि फक्त घोषणाबाजी व थिल्लर पणा करत अधिवेशनाचा वेळ वाया घातला जनतेच्या कुठल्याही समस्या विरोधी पक्षांनी सरकार समोर मांडल्या नाहीत. विकास आघाडीतील नेत्यांनी नेहमी फक्त विरोधाला विरोध म्हणून शिंदे फडणवीस सरकारच्या कामात अडथळा आणण्याचे काम केले. यातून असेच दिसून आले की विरोधी पक्ष फक्त पायऱ्यांवरील अधिवेशन करतो.
