महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबातील व्यक्तींनी राजकारणातील अनेक महत्त्वाची पदे भूषवली व वारंवार घराणेशाहीचे राजकारण महाराष्ट्रात केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि पुतणे अजित पवार तसेच 2019 च्या निवडणुकांमध्ये रोहित पवार, पार्थ पवार यांनी देखील राजकारणात प्रवेश केला. रोहित पवार यांनी सुरुवातीला जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणाला सुरुवात केली. 2017 साली ते बारामती तालुक्यातील शिरसूफ गुणवडी ह्या जिल्हा परिषद सर्कल मधून जिल्हा परिषद सदस्य झाले.
परंतु घराणेशाहीतील नागरिकांना फार रुचलेले दिसत नाही. म्हणूनच मावळ मतदार संघातून पार्थ पवार यांचा दारुण पराभव झाला तर रोहित पवार यांचा कर्जत-जामखेड मतदारसंघातून विजय झाला. यामध्ये हा प्रश्न उभा राहतो की, शरद पवार रोहित पवारांना सॉफ्ट कॉर्नर आहे का? रोहित पवारांचा विशेष असा राजकारणात फार संघर्ष नाही. रोहित पवार यांनी 2016 -17 पासून कर्जत-जामखेड मतदारसंघ फिरून त्यामध्ये वेगवेगळ्या गावांना नागरिकांना भेटी देण्यास सुरुवात केली. तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्या-पेन तसेच इतर गोष्टी वाटप करून त्यावर आपला फोटो लावून एक प्रकारे प्रचार सुरू केला. एकीकडे रोहित पवारांना शरद पवारांचा पूर्ण पाठिंबा दिसत होता. तर दुसरीकडे मावळ मतदार संघांमध्ये जेव्हा पार्थ पवार हे प्रचारासाठी फिरत असताना शरद पवारांचा पाठिंबा दिसला नाही. अजित पवार यांना रोहित पवारांना दिलेली उमेदवारी आवडली नव्हती. सगळीकडे अशी चर्चा सुरू झाली की आता अजित पवारांऐवजी शरद पवारांचे उत्तराधिकारी म्हणून रोहित पवारांकडे पाहिले जात आहे.
एकीकडे अनेक इच्छुक उमेदवार दिवस-रात्र पक्षासाठी झटत असताना दिसताय. राष्ट्रवादीत मात्र घराणेशाहीला घरातील व्यक्तींना आमदार,खासदार करण्यात रस आहे. रोहित पवारांनी असं कोणतं शिक्षण क्षेत्रात काम केलं की त्यांना रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी नियुक्त करण्यात आले. कर्मवीर भाऊराव पाटलांनी मोठा संघर्ष करून गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं, शिक्षण हे गरिबांपर्यंत पोहोचावं या दृष्टीने रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
शरद पवारांनी यामध्ये घराणेशाही आणली रोहित पवार सारख्या नवख्या आमदाराला सदस्य केले व पुन्हा एकदा दाखवून दिलं की राज्यात घराणेशाही आहे. रोहित पवार हे त्यांचे वारसदार म्हणून भविष्यात काम करतील.
याचबरोबर रोहित पवार हे बारामती ॲग्रो लिमिटेड या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत. यावरून लक्षात येते की, राजकारणात काहीच अनुभव नसताना कर्तव्य शून्य अशा रोहित पवारांना शरद पवार यांनी आमदार केलं, भविष्यात मंत्री देखील करतील.
