छत्रपती संभाजीनगरातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा मोठा पराभव झाला आहे. या ठिकाणी मंत्री संदीपान भुमरे यांचा मोठा विजय झाला आहे. या ठिकाणी आपल्या पराभवाला पक्षातील काही लोक जबाबदार असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अंबादार दानवे यांना तिकीट मिळेल अशी आशा होती. परंतू त्यांना तिकीट न देता पक्षाने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना तिकीट दिले. त्यामुळे दोन्ही नेत्यातील वाद मातोश्रीपर्यंत पोहचला होता. आता पुन्हा पराभवानंतर चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर नाव न घेता टीका करीत उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.
एमआयएमचे उमेदवार माजी खासदार इम्तियाज जलील हे 3 लाख 41 हजार 480 मते घेत दुसऱ्या, तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे 2 लाख 93 हजार 450 मते घेत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. लोकसभेच्या या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. पराभव होईल असे कधीच वाटत नव्हते. मुख्यमंत्री इथे मुक्कामी होते, त्यांनी काय घोळ केला माहिती नाही. संदीपान भुमरे यांनी 80 कोटी रुपये वाटले, काही लोक पैशांच्या मागे पडले. मी व्यसनमुक्ती आहे. प्रचंड सेवा केली, एकनिष्ठ राहिलो, असं चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
पराभवानंतर चंद्रकांत खैरे यांनी आंबादास दानवेंवर टीका केली आहे. मला पक्षातील काहींनी काम केलं नाही, असा संशय आहे. पक्ष प्रमुखाकडे तक्रार करणार असल्याचं खैरेंनी म्हटले आहे. तर पुढे विधानसभेत धोका होऊ नये, यासाठी मी पक्ष प्रमुखांना भेटणार तक्रार करणार आहे. मी एकटा पडलो, ते फक्त यायचे बसायचे. यावेळेस तरी अंबादास दानवे यांनी काम करायला पाहिजे होते. त्यांनी जबाबदारी पार पाडायला पाहिजे होती, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं.
मी एकटा पडलो, ते फक्त यायचे बसायचे. तो मोठा माणूस झाला, तो जिल्हा प्रमुख आहे. त्याने काम केलं पाहिजे होते. या वेळेस तरी अंबादास दानवे यांनी काम केले पाहिजे होते. त्यानी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे होती असेही चंद्रकांत खैरे म्हणाले.
