संपलेल्या पक्षातील लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देऊ नये

राजकारणात एकमेकांवर चिखलफेक करणं एकमेकांना आव्हान देणं तस नवीन नाही. राजकारण म्हणलं कि एकमेकांवर टीका टिप्पणी, दावे-प्रतिदावे आले. प्रत्येक जण आपली राजकीय उंची बघून समोरच्यावर टीका करतो. हल्ली कमी काळात प्रसिद्धीच्या झोतात आलेले नेत्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कर्तृत्व शून्य असताना आपल्या पेक्षा एखाद्या मोठ्या नेत्याला आव्हान देणं हा आत्मविश्वास काही लोकांमध्ये वाढला आहे.


समाज माध्यमात प्रसिद्ध झालेल्या व संपलेल्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समोर-समोरच्या चर्चेसाठी आव्हान दिल आहे. कुणी-कुणाला आव्हान देणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण अशाने सिंहाला आव्हान देणं हे हास्यास्पद आहे. आव्हान देताना आपली योग्यता तपासणं गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सांभाळलं आहे मुख्यमंत्री पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते नेते आहेत. सध्या ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद सांभाळत आहेत. विरोधीपक्ष नेता असताना त्यांना महाविकास आघाडीला सळोकीपळो केले होते.
राजकारणात फडणवीस यांनी आपली क्षमता सिद्ध करून दाखवली आहे. वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग पक्षासाठी करून दिला आहे. सुषमा अंधारे यांनी फडणीस यांना आव्हान देण्याच्या आधी आपल्या राजकीय प्रवासाची उजळणी करायला हवी. त्या कुठल्या पक्षात होत्या त्यांनी आधी कुणाकुणावर टीका केली त्याच लोकांसोबत आता काम करण्याची त्यांच्यावर वेळ का आली हे त्यांनी आधी स्पष्ट करावं. त्यांचे विचार त्यांच्या जुन्या व्हिडिओ मधून लोकांपर्यंत पोहचले आहेत. महाराष्ट्रातही किती जनता ह्या आधी त्यांना ओळखत होती हा देखील संशोधनाचा विषय आहे. केवळ शिंदे-फडणवीस सरकार वर टीका करण्यासाठी त्यांची उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केली असावी.


त्यांनी कधी संविधानिक पद भूषविले नाही. ना कोणता पक्षात त्यांना मानाचे पद मिळाले तरीही त्या देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या नेत्यांना आव्हान देण्याची भाषा करतात. देवेंद्र फडणवीस यांना काही महत्व देत नाहीत. पण त्यांच्यासमोर बसलेले प्रेक्षक टाळ्या वाजवतात माध्यमांमधून प्रसिद्धी मिळते. त्यामुळे आव्हानाची ही भाषा सुचते. दुसऱ्या पक्षातून उसन्या घेण्यात आलेल्या सुषमा अंधारे फडणवीस यांच्या सारख्या नेत्याला आव्हान देतात तेंव्हा त्यांची गंमत वाटते अर्थात त्याच्याकडे गांभीर्याने बघायला नको. ठाकरे गटाला बोलघेवड्या नेत्यांची गरज होती जी गरज अंधारे आपल्या भाषणातून पूर्ण करत आहेत.