राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करून २०१९ मध्ये सरकार स्थापन केले. हे सरकार जनतेचं सरकार नव्हतं जनतेनं भाजप-शिवसेना यांना बहुमत दिले होते परंतु मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षांसोबत युती करून सरकार स्थापन केले. राष्ट्रवादी व काँग्रेसला उद्धव ठाकरे यांच्यामुळे आयती सत्ता भेटली व सुरु झाला तो महाविकास आघाडीचा मनमानी कारभार.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना ज्या महत्वाच्या योजना त्यांनी सुरु केलाय होत्या त्या अनेक योजनांना ह्या सरकारने स्थगिती दिली. काही योजनांचे नाव बदलली व त्या योजना नव्याने सुरु केल्या. आम्हीच हे केलं हे जनतेला भासवण्याचा प्रकार केला व हळूहळू मनमानी कारभाराला सुरुवात केली. सरकार विरोधात बोलणाऱ्यांना तर जेल मध्ये टाकण्यात आले. तर काही मंत्र्यांनी गुंडांप्रमाणे काही लोकांना आपल्या निवासस्थानी आणून मारहाण केल्याच्या घटना देखील घडल्या हे सर्व सत्तेच्या जोरावर चालू होते.
यांनी पोलीस बळाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केलेला आपण पहिले. एबीपी माझाचे पत्रकार यांनी रात्रीत त्याच्या राहत्या घरी जाऊन अटक करण्याचा प्रकार झाला त्याचप्रकारे आपलं अपयश झाकण्यासाठी ज्या सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरण पत्रकार अर्णव गोस्वामी यांनी उचलून धरले होते व यामुळे सरकार अडचणीत येण्याची भीती महाविकास आघाडीला वाटू लागली काही मंत्र्यांचे नाव देखील या प्रकरणात समोर आल्याने अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली ही अटक कायद्याच्या कोणत्याच चौकटीत बसत नव्हती परंतु सरकारला अडचण निर्माण होऊ नये म्हणून ही अटक करण्यात आली.
हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे यांना मात्र, राणा दाम्पत्याच हिंदुत्व आवडलं नाही म्हणून त्यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा वाचण्यासाठी आलेल्या खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांना देखील खोट्या गुन्ह्यात १४ दिवस जेल मध्ये टाकण्यात आले व त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले आपल्या विचारांना तिलांजली देऊन राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षांसोबत सत्तेत बसलेल्या उद्धव ठाकरें कडून हे अपेक्षितच होत. राष्ट्रवादीची शिवसेना हे जयंत पाटील अधिवेशन चालू असताना म्हणाले होते परंतु त्याची सुरुवात २०१९ मध्येच झाली होती. अडीच वर्ष घराबाहेर न पडणारे मुख्यमंत्री व मनमानी कारभार करणारे सरकार या काळात महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळाले.
