देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुत्रधर्म पाळल्यानंतर पाळला राजधर्म!

देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांना काल मातृवियोगाच्या दु:खाला सामोरं जावं लागलं. मोदी कुटुंबीयांच्या उपस्थितीत साधेपणाने हिराबा यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. आईच्या निधनानंतरही आपल्या नियोजित कामांत व्यत्यय घेऊ नये. याबद्दल त्यांचे सहकारी मंत्री व भाजप नेत्यांनी पंतप्रधानांची कर्तव्यनिष्ठा व कटिबद्धतेची प्रशंसा केली. आईच्या अंत्यसंस्काराच्या काही मिनिटांतच पंतप्रधान मोदी यांनी थेट गुजरातच्या राजभवनावर जाऊन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. तेव्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह उपस्थितच नव्हे तर सारे जग अवाक झाले. मोदी यांनी धीरगंभीरपणे कार्यक्रमात भाषणही केले. त्यांनी पश्चिम बंगालसाठी हजारो कोटी रूपयांच्या विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच हावडा- न्यू जलपाईगुडी दरम्यान धावणाऱया वंदे भारत रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखविला. मोदी यांच्या कर्तव्यपथावरील या तपश्चर्येबाबत सारे जग प्रशंसोत्गार काढले.

तब्बल ३३ वर्षांपूर्वी जेव्हा गुजरातच्या वडनगरमधील दामोदरदास मोदी यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर काही तासांतच नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या अहमदाबादमधील ठरलेल्या ‘विशेष’ बैठकीसाठी उपस्थित झाले होते. तेव्हाही उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला होता. माझ्यासाठी माझे कर्तव्यही महत्वाचे आहे, अशी भावना त्यांनी सहकाऱ्यांशी बोलताना व्यक्त केली होती.

पंतप्रधान मोदी आईच्या आठवणींच्या उजाळा देताना लिहतात,“माझी आई जितकी साधी तितकीच असामान्य आहे. आईला इतर लोकांच्या आनंदात आनंद मिळत असे. प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान हे त्यांचे सर्वात मोठे गुण होते. “गरिबीशी आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या अनेक आव्हानांशी झुंज देत असूनही त्यांनी कधी प्रामाणिकपणाची कास सोडली नाही की कधी स्वाभिमान बाजूला ठेवला नाही. कोणत्याही आव्हानांवर मात करण्यासाठी ‘सातत्यपूर्ण कठोर परिश्रम’ हाच त्यांचा पहिला मंत्र असे !” आई त्यांना म्हणायची, “मला तुझ्या सरकारमधले काम काही कळत नाही, पण तू कधीही लाच घ्यायची नाहीस, इतकेच सांगते.” माझी काळजी करू नये आणि अधिक मोठ्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष केंद्रित करावे, असे त्यांची आई त्यांना नेहमीच सांगत आली आहे. ते जेव्हा जेव्हा आईशी फोनवर बोलतात, तेव्हा तेव्हा ती सांगते, “कधीही काही चुकीचे करू नकोस, कोणाशीही वाईट वागू नकोस आणि सतत गरिबांसाठी काम करत राहा.”