संजय राऊत यांना दणका, शिवडी काेर्टाचे अजामीनपात्र वाॅरंट जारी

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्यांनी केलेला मानहानीच्या दाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना माेठा दणका बसला आहे. राऊत यांच्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. याप्रकरणी शिवडी कोर्टात पुढची सुनावणी २४ जानेवारीला होणार आहे.

संजय राऊत यांनी १०० कोटींच्या शौचालय घोटाळा प्रकरणी मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. त्यावरुन मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांना नोटीस बजावली होती. ४८ तासांत माफी मागा अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला होता. मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात शिवडी कोर्टात मानहानीचा दावा केला आहे. मेधा सोमय्यांच्या याचिकेवर सुनावणी वेळी संजय राऊत सातत्याने गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हे वॉरंट जारी केले आहे.