आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले होते आणि जवळपास 38 हजार कोटींच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांचे भाषण झालं त्या भाषणात त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला आणि प्रामुख्याने त्यांनी मुंबईला केंद्रस्थानी ठेवून आपलं भाषण केलं. त्याला स्वाभाविक कारण म्हणजे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका त्याच अनुषंगाने मुंबई हे किती महत्त्वाचा शहर आहे हे सर्वांना माहित आहे आणि या मुंबईमध्ये जर नागरिकांना योग्य सोयी सुविधा देण्यात आल्या आणि त्या वेळेत लोकांपर्यंत पोहोचल्या, त्यांना त्या उपलब्ध झाल्या तर निश्चितपणे लोक त्या सरकारवर त्या प्रशासनावर विश्वास ठेवतात हे मोदींना चांगलेच माहिती आणि त्याच अनुषंगाने त्यांनी आपल्या भाषणात मुंबई केंद्रित अशा सगळ्या गोष्टींवर भर दिला.

या सगळ्या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने मेट्रोच्या, सांडपाणी प्रक्रिया करणारे प्लांटचे लोकार्पण झालं व स्वनिधी योजनेबद्दल देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. सूर्य प्रकल्प योजना या मुंबई केंद्रित आहेत. मुंबईकरांसाठी या योजना महत्त्वाच्या आहेत. त्यांना दिलासा देणाऱ्या अशा या योजना आहेत ही सगळ्या कामाचे आणि योजनांचे भूमिपूजन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. आता त्यांच्याच असते लोकार्पण सुद्धा झालं. पूर्वी एखाद्या प्रकल्पाचे उद्घाटन किंवा भूमिपूजन झाले की तो प्रकल्प वर्षानुवर्ष रेंगाळत पडायचा आता मात्र तसं होताना दिसत नाही. कमी कालावधीत काम पूर्ण करून लोकांपर्यंत सुविधा पोहोचवण्याचं काम आपण करत आहोत हा विश्वास नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिला आहे.

महाविकास आघाडीच्या काळात ज्या प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली होती त्याचा उल्लेख देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला अर्थात त्यांनी थेट गेल्या सरकारचा उल्लेख करणे टाळल त्यांनी फक्त स्थगिती दिलेल्या प्रकल्पाबद्दल बोलणं उचित्त समजलं. दिलेल्या प्रकल्प बद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले आधीच्या सरकारने स्थगिती दिल्याने अनेक अडचणी आल्या. अनेक कामे रखडली पण आमचं सरकार असं कधी करत नाही, कधी कोणत्या विकास कामात अडचण आणणे किंवा ते होऊ न देणे हा आमचा स्वभाव नाही आणि तेच त्यांनी दाखवून दिलं.

भ्रष्टाचारावर ते बोलत होते, विकास कामांना गती देण्यासाठी महानगरपालिकांच्या कामांमध्ये सुशासन आणण्यासाठी भ्रष्टाचार रोखणे गरजेचं आहे असं यावेळी पंतप्रधान म्हणाले. सरकार विकास कामांना गती देणारे सरकार आहे ते कधी विकास कामात अडथळा आणत नाही आणि आमच्या सरकार भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे काम करत आहे. आगामी काळात शिंदे फडणवीस सरकार तुमच्या स्वप्नांची पूर्ती करेल असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांचे पूर्ण भाषण हे मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच होतं हे दिसून आले. त्यामुळे त्यांनी थेट जरी सांगितलं नसलं तरी कालच्या दौऱ्यातून व त्यांच्या भाषणातून हे लक्षात येतं आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग त्यांनी फुंकले आहे.