बहिणीला व्हिडिओ कॉल करुन गळफास घेऊन आत्महत्या

डीसीएन न्यूज नेटवर्क

पुणे : कौटुंबिक वादातून एकाने बहिणीला व्हिडिओ कॉल करुन गळफास घेऊन आत्महत्या केली. २४ ऑक्टोबरला दुपारी सव्वातिनाच्या सुमारास येरवडा भागात ही घटना घडली. पतील आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पत्नीसह दोन मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन अशोक साळवे (वय ४२, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
( Man Dies by Suicide on Video Call to Sister in Yerawada)

याबाबत त्यांची बहीण पूनम उमेश कांबळे (वय ४०, रा. कोकीळा बिल्डिंग, बालाजीनगर, धनकवडी) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन साळवे यांची पत्नी आरती नितीन साळवे (वय ३८), तसेच त्यांच्या १८ आणि २० वर्षांच्या मुलींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन अशोक साळवे हे मुंबईतील महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाच्या (म्हाडा) कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून काम करत होते. पत्नी आणि दोन मुलींबरोबर ते पर्वती परिसरातील लक्ष्मीनगरमध्ये राहात होते. कौटुंबिक कारणावरून त्यांच्यात वाद व्हायचे. २४ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वातिनाच्या सुमारास नितीन साळवे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी बहीण पूनम यांना व्हिडिओ कॉल केला होता.

पत्नी आणि मुलींच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवले ?
पत्नी आणि मुलींसोबत नेहमी होणाऱ्या वादामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी बहिणीला सांगितले व त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर पूनम यांनी तक्रार दिली आहे. कांबळे यांनी पत्नी आणि मुलींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी फिर्यादीत केला. त्यानंतर याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक बसवराज माळी या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *