
भारतात कोविड आल्यापासून आता काही दिवसातच एक वर्ष पूर्म होईल. गेलं एक वर्ष आपण सगळ्यांसाठीच खूप जास्त कठीण आणि परीक्षा पाहणारं होतं, मात्र या एक वर्षाने आपल्याला भरपूर काही शिकवलं. कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित कुठलं राज्य असेल तर ते म्हणजे महाराष्ट्र, आणि त्यातूनही मुंबई. मुंबईच्या धारावी येथील देशातील सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीतही कोरोनाने आपले पाय पसारले. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोठ्या प्रयत्नांनी धारावी येथील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली. आता पुन्हा एकदा धारावी येथे कोरोना वाढतोय. कोरोनाच्या रुग्ण संख्यामध्ये होणाऱ्या वाढीला पाहता आता महाराष्ट्र प्रशासन धारावी येथील कोरोना परिस्थिती कशी काय हाताळते, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
धारावी मध्ये पुन्हा एकदा कोरोना वाढण्याचे कारण म्हणजे, धारावी येथे मोठ्या प्रमाणात लोक विना मास्क फिरताना दिसताएत. कोरोना आता गेला, आता पुन्हा तशी परिस्थिती येणार नाही, अशा काही विचारधारणेतून लोक मास्क लावत नाहीयेत, सोशल डिस्टेंसिंग पाळत नाहीयेत, त्यामुळे धारावी येथे मोठ्या प्रमाणात कोरोना वाढत असल्याचे आढळून आले आहे. हे प्रमाण अगदी झोपडपट्टीत आढळून आले नसले धरी धारावी या भागात सर्दी, खोकला, तापाचे प्रमाण आढळणारे खूप रुग्ण सापडताएत, त्यामुळे पूर्वी सारखी परिस्थिती होवू नये यासाठी मोठ्या प्रमाणात काळजी घेणे आवश्यक आहे.
धारावीमध्ये आजवर ४,०२४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील उपचाराधीन रुग्णसंख्या २८ नोंदवण्यात आली आहे. रुग्णालयातून वैद्यकीय उपचार घेऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ३६८० इतकी आहे. माहीमध्ये उपचाराधीन रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली असून ती १३१ इतकी आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण ४९३२ इतके आहे. तर, दादरमध्ये करोनारुग्णांची संख्या आत्तापर्यंत ५०४५ रुग्णांची नोंद झाली असून त्यात उपचाराधीन रुग्णसंख्या ९८ इतकी आहे. धारावीमध्ये रविवारी ही रुग्णसंख्या ४०१९ इतकी होती. त्यावेळी दादरमध्ये रुग्णसंख्या ५०३५, तर माहीममध्ये ही संख्या ४९२२ इतकी नोंदवण्यात आली होती. २० फेब्रुवारी रोजी एकत्रित पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या धारावीमध्ये ४०१२ इतकी होती, तर दादरमध्ये हे प्रमाण ५०२९ इतके नोंदवण्यात आले. उपचाराधीन रुग्णांमध्ये धारावीमध्ये हळूहळू वाढ होत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते.
एकूणच महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात कोरोना पुन्हा एकदा वाढतोय. असे म्हटले जात आहे कि ही कोरोनाची तिसरी लाट आहे. त्यामुळे आता आणखी काळजी घेणे आवश्यक आहे. अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. प्रशासनाने देखील आदेश दिले आहेत, मात्र एक सामान्य व्यक्ति म्हणून देखील आपण सर्व नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत, आणि अधिक काळजी घेतली पाहिजे.
