युवा नेते आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे गटाला कशा पद्धतीने बळकटी देता येईल, संघटनेला बळकटी देण्यासाठी त्यांनी मोहित आखली आहे असे बोलले जाते. त्यांच्या यात्रेचा हा सातवा टप्पा असून यात्रेला ‘शिवसंवाद’ असे नाव दिले आहे. येथे एक प्रश्न प्रखरशाने उपस्थित होता की पुन्हा-पुन्हा गद्दार, खोके, विश्वासघात यापलीकडे ते जाणार आहेत का? जर हे त्यापलीकडे जाणार नसतील तर हा शिवसंवाद ठरतच नाही.
ठाकरे गटातील सर्व नेते प्रामुख्याने संजय राऊत,उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे शिंदे गटातील नेत्यांवर जहरी टीका करताना दिसत असतात. त्यांचे शब्द हे नेहमीचेच झाले आहे. त्यात नाविन्यता कुठेही राहिलेली नाही. ते लोकांना रटाळवाणे वाटू लागले आहे. नाशिक मध्ये जेव्हा शिवसंवाद यात्रा पोहचली,त्यावेळी आदित्य ठाकरेंनी नेहमीच्या शब्दांची पुनरावृत्ती केली. आता लोकांना देखील या शब्दांची पूर्ण कल्पना आली आहे.माझ्या आजोबांना कसे चोरले. खोके,गद्दार हे शब्द तर नेहमीचे झाले आहे. खरतर आश्चर्य या गोष्टीच वाटत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली, संघटना बांधली त्यांची विचारधारा लोकांपर्यंत पोहचण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला. त्यामुळे राज्यातील असंख्य शिवसैनिकांच्या घरात आज शिवसेनाप्रमुखांचा फोटो असतो. खरतर बाळासाहेबांच्या विचारांशी इमान ठेवणारे त्यांचा फोटो आदराने वापरत असतात. बाळासाहेब हे कोणा एका कुटुंबाची मत्तेदारी नाहीये.
शिवसंवाद यात्रेत आगामी काळात पक्ष उभा राहण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने ध्येय-धोरणे ठरवून पुढे जायला हवे, पक्षाची उद्दिष्ट्ये, पक्षाची कामाची रणनीती काय असणार आहे. मात्र,आदित्य ठाकरेंचे नाशिक मधील भाषण पाहिल्यावर मागील सहा महिन्यातील तीच-तीच वाक्य त्यांच्या बोलण्यात येतात. त्यात मग दावोसला गेल्यावर 40 खोके खर्च केले पण आणले काहीच नाही. 40 गद्दार महाराष्ट्रात धुमाकूळ घालताय. जनसंवाद साधत असताना एक-दोन वेळा चहाडया ऐकायला बऱ्या वाटू शकतात पण ते नेहमीचे झाल्यावर लोकांना त्यात रस राहत नाही. त्यात मग संवाद हा संवादासारखा राहत नाही. रोज विरोधी पक्षाला वाईट सांगून यातून कोणता संवाद साधने होते याला संवाद न म्हणता हा विसंवाद किंवा स्वसंवाद होईल.
स्वतःचा संताप दुसऱ्याला जाऊन सांगणे. रोज राग, क्रोध, चीड व्यक्त करणे हा शिवसंवाद होऊ शकत नाही.
आदित्य ठाकरे तेच-तेच बोलतात यापुढील सभेत त्यांनी काहीतरी नवीन बोलावे अशी आशा आहे. नाहीतर मग हा ‘शिवसंवाद’ नाहीतर ‘स्वसंवाद’ होईल.
