भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं एका मोठ्या आणि दमदार विजयाची नोंद केली आहे. भारतानं सामना 1 डाव आणि 132 धावांच्या फरकानं जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. सामन्यात सुरुवातीपासून भारतानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. ज्यात ऑस्ट्रेलियाला 177 धावांत सर्वबाद करुन भारतानं पहिल्या डावात 400 धावा करत 223 धावांची आघाडी घेतली. ज्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 91 धावांत आटोपत सामना 1 डाव आणि 132 धावांनी जिंकला आहे. भारताकडून रवींद्र जाडेजाने दोन्ही डावात मिळून 7 तर अश्विननं दोन्ही डावांत मिळून 8 विकेट्स घेतल्या. याशिवाय कॅप्टन रोहित शर्माने 120 तर अक्षर पटेल 84 आणि रवींद्र जाडेजा 70 यांनी सर्वाधिक धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा युवा फिरकीपटू टॉड मर्फीने एका डावातच 7 विकेट्स घेत चांगली कामगिरी केली पण अखेर सामना भारतानं मोठ्या फरकाने जिंकला आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या कांगारूंचा पहिला डाव 177 धावात संपवला. त्यानंतर आपल्या पहिल्या डावात 400 धावांचा डोंगर उभारत पहिल्या डावात 223 धावांची आघाडी घेतली. रवींद्र जडेजा, आर अश्विन यांच्या फिरकीसमोर ऑसी फलंदाज फ्लॉप ठरला. तर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी सुरूच राहिली आणि भारताने अडीच दिवसांत कसोटी जिंकली. भारताने 1 डाव व 132 धावांनी विजय मिळवताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.फलंदाजीत बोलायचे झाले तर रोहित शर्माने सर्वाधिक 120 धावा तर अक्षर पटेलने 84 आणि रविंद्र जडेजाने 70 धावांचे योगदान दिले.
