भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीवर लवकरच चित्रपट ; रणबीर कपूर ‘दादा’च्या भूमिकेत

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची मोठी चलती आहे. त्यातल्या त्यात क्रिकेटर्सच्या आयुष्यावर अनेक बायोपिक तयार होतं आहेत. महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर यांच्या बायोपिकच्या प्रचंड यशानंतर आत्ता अनेक क्रिकेटर्सच्या आयुष्यावर आधारित बयोपिक येत आहेत. त्यामध्ये कपिल देव मिताली राज यांच्यासह आता क्रिकेटर सौरभ गांगुलीचासुद्धा समावेश झाला आहे. लवकरच दादाच्या आयुष्यावर बायोपिक येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून याची जोरदार चर्चा रंगली होती. चित्रपटात ‘दादा’ची भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे. त्याशिवाय अन्य क्रिकेटपटूंची भूमिका कोण साकारणार? याबाबतची कोणताही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार एमएस धोनीवरचं कॅरेक्टरही असेल.

सौरव गांगुलीच्या या बायोपिकमध्ये त्याच्या खासगी आयुष्यावरही प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. 1983 नंतर गांगुलीने 2003 मध्ये इंडियन क्रिकेट टीमला आयसीसी वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये नेलं होतं. मात्र त्यावेळी टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाच्या टीमने पराभव केला होता. त्यावेळी दादा त्याची टीम बनवण्यात यशस्वी ठरला होता. सर्वोत्कृष्ट इंडियन कॅप्टन्समध्ये सौरवची गणना होते आणि त्याने अनेक नव्या, तरुण खेळाडूंना संधी दिली, असंही म्हटलं जातं. यामध्ये वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, युवराज सिंह, हरभजन सिंह आणि इरफान पठाण यांचाही समावेश होता.

सौरव गांगुली कर्णधार म्हणून खूप यशस्वी होता, त्यासोबतच तो फलंदाज म्हणूनही खूप यशस्वी होता. सौरव गांगुलीने आपल्या कारकिर्दीत 18 हजारांहून अधिक धावा केल्या. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 38 तके आणि 107 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारात त्याची फलंदाजीची सरासरी 41+ आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 132 विकेट्सही घेतल्या आहेत.