द्राक्षाचा हंगाम सुरू होताच अवकाळीचे संकट; द्राक्ष उत्पादक संकटात

द्राक्ष पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे. सध्या द्राक्षाचा हंगाम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात लोकल बाजार आणि परदेशात निर्यात होत असते. मात्र, मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसाने मोठा शेतकऱ्यांना बसला. अशातच पुन्हा अवकाळी पाऊस पडू लागला आहे. नाशिक जिल्ह्यात पुन्हा दोन दिवसांपासून मध्यरात्री मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे आधीच द्राक्ष निर्यातीला ब्रेक लागलेला असतांना लोकल बाजारात द्राक्षाकडे कुणी बघायला सुद्धा तयार नाहीये. त्यामुळे तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला द्राक्षाचा मनुका करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

काल मुंबई आणि उपनगरासह विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात काही ठिकाणी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे. काही ठिकाणी गारपीटही झालीय. मुंबईच्याही अनेक भागात काल पावसाच्या सरी आल्या. दरम्यान आज 17 मार्चलाही ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा देण्यात आलाय. काल झालेल्या गारपीट पावसामुळे राज्याच्या अनेक भागात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकरी हवालदिल झालाय.