ICC एकदिवसीय विश्वचषक 2023च्या तारखा जाहीर!

दिल्ली : या वर्षाच्या अखेरीस भारतीय भूमीवर होणार्‍या क्रिकेटच्या महाकुंभाच्या तारखांबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. एवढेच नाही तर 2023 च्या वनडे वर्ल्ड कपचा अंतिम सामना कोणत्या दिवशी आणि कोणत्या मैदानावर होणार याचीही बरीच माहिती समोर आली आहे. याशिवाय 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचे सामने कोणत्या शहरांमध्ये खेळवले जाणार हे रहस्यही उघड झाले आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार या वर्षी भारतात होणारा 2023 विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकतो.

आता टीम इंडियाचे यंदाचे सर्वात मोठे लक्ष्य 2023च्या वनडे विश्वचषकावर नाव कोरण्याचे आहे. 12 वर्षांपूर्वी घरच्या मैदानावर खेळलेल्या 2011 विश्वचषकाचे विजेतेपद भारताने जिंकले होते. अशा परिस्थितीत यावेळी भारत 2023 विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

2023 मधील वर्ल्ड 46 दिवस चालणार असून, या दरम्यान 10 संघामध्ये 3 प्ले ऑफ बरोबरच एकूण 48 सामने खेळवले जाणार आहे.

कोणत्या शहरात होणार सामने?
बीसीसीआयने वर्ल्ड कपचे सामने खेळवण्यासाठी अहमदाबादबरोबर बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, धर्मशाळा, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, इंदूर, राजकोट आणि मुंबई ही ठिकाणी शॉर्टलिस्ट केली आहेत. आयसीसीच्या स्पर्धांचं वेळापत्रक एका वर्षापूर्वीच जाहीर केलं जात मात्र, यावेळी बीसीसीआयला केंद्र सरकारकडून काही महत्त्वाच्या मुद्द्यांना मंजुरी मिळणे बाकी आहे. यातील पहिला मुद्दा आहे तो पाकिस्तान संघाला व्हिसा मंजूरी आणि दुसरा स्पर्धेला करात सुट देण्याबद्दल.

पाकिस्तानला व्हिसा मिळणार का?
आयसीसीची मागील मीटिंग दुबईमध्ये झाली होती. रिपोर्ट्सनुसार या मीटिंगमध्ये बीसीसीआयने हे आश्वासन दिलं आहे की वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी संघाला भारतीय दौऱ्यासाठी व्हिसा दिला जाईल. दुसरं म्हणजे करात सवलत देण्याचा मुद्दा, तर त्यावरही अशी आशा आहे की, बीसीसीआय लवकरच भारत सरकारच्या भूमिकेबद्दल आयसीसीला कळवणार आहे.

2012 पासून भारत- पाकिस्तानमध्ये एकही मालिका नाही
डिसेंबर 2012 पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका झालेली नाही. त्यावेळी पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. दोन्ही संघामध्ये 2 टी20. 3 एकदिवसीय मालिका खेळवली गेली होती. टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली होती. तर एकदिवसीय मालिका पाकिस्तानने 2-1 ने जिंकली होती.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. भारतात होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेला अजून 7 महिने बाकी आहेत. यावर्षी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल (लंडन) मैदानावर 7 जून ते 11 जून दरम्यान खेळल्या जाणार आहे.