वाढदिवसाला राम चरणकडून चाहत्यांना सरप्राइज; नव्या चित्रपटाची घोषणा

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार राम चरण याचा आज वाढदिवस आहे. ‘आरआरआर’ या चित्रपटामुळे त्याला वेगळी ओळख मिळाली. त्याचा चाहतावर्ग देखील खूप वाढला आहे. आज जगभरात राम चे करोडो फॅन्स आहेत. फक्त सिनेमाच नाही तर विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या राम चरण मोठ्या संपत्तीचा मालक आहे. राम चरणने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक सरप्राईज दिले आहे. दरम्यान दक्षिण चित्रपट उद्योगातील प्रसिद्ध अभिनेते राम चरण यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे अधिकृत शीर्षक जाहीर केले आहे. राम चरण यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे.

राम चरणचा ‘गेम चेंजर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाची घोषणा झाल्यामुळे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘आरआरआर’ प्रमाणे ‘गेम चेंजर’देखील सुपरहिट होईल असे म्हटले जात आहे. राजकारणावर आधारित या नाट्यमय सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. ‘विक्रम’, ‘शिवाजी’, ‘रोबोट’ अशा अनेक लोकप्रिय सिनेमाचं दिग्दर्शन केलेला एस शंकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.

गेल्या वर्षी राम चरण राजामौली यांचा सुपरहिट चित्रपट ‘आरआरआर’ मध्ये दिसला होता. या चित्रपटाला देशभरात ओळख मिळाली. राम चरण हिंदी प्रेक्षकांमध्येही खूप प्रसिद्ध झाले आहेत. लोक त्याच्या चित्रपटांची वाट पाहत आहेत. राम चरणच्या नवीन चित्रपटाच्या शीर्षकाच्या घोषणेने हिंदी प्रेक्षकही खूश आहेत आणि त्यांचे सतत अभिनंदन करत आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की ते राम चरणचा गेम चेंजर चित्रपटगृहांमध्ये नक्कीच पाहतील.