जितेंद्र आव्हाड यांचे लज्जास्पद ट्विट; हाेऊ शकताे विनयभंगाचा गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत लज्जास्पद ट्विट केले असून याबाबत त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी हाेत आहे. स्त्रीला लज्जा उत्पन्न करणारे आणि तिच्या सभ्यतेला बाधा आणणारे वक्तव्य केल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल हाेताे. हे ट्विट तसेच असल्याचे म्हटले जात आहे. जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यात गेल्हा दोन-तीन दिवसापासूव टि्वरवॉर रंगले आहेत.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मालेगावात सभा झाली. या सभेच्या निमित्ताने लागलेल्या बॅनरवरुन शीतल म्हात्रे यांनी ठाकरेंच्या फोटो टि्वट केला होता. हीच का तुमची हिंदुत्त्ववादी विचारधारा? असा सवाल म्हात्रेंनी विचारला. आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उर्दू भाषेतील बॅनर प्रसिद्ध करुन शीतल म्हात्रेंना प्रत्युत्तर दिलं होते. दुसऱ्यांवर ढकलायची तुमची सवय आहे. त्यावर पवारांची भाकरी आणि उद्धवजींची चाकरी.लगे रहो भाईजान असे उत्तर म्हात्रेंनी दिले.

राजकीय वाद सुरू असताना आव्हाडांनी त्यामध्ये वैयक्तिक संदर्भ आणून अत्यंत लज्जास्पद ट्विट केले. त्याची चिंता आपल्याला नसावी. उगाचच बोलायला लावू नका. घरचा उपाशी, बाहेरचा तुपाशी”, असे या ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हटले आहे.म्हात्रे यांच्या एका माॅर्फ केलेल्या  व्हिडिओवरुन त्यांची बदनामी करण्यात आली हाेती. याच  व्हिडिओच्या संदर्भातून आव्हाड यांनी हे ट्विट केले आहे. मात्र, हे ट्विट महिलेच्या सभ्यतेचा अपमान करणारे असल्याची टीका हाेत आहे. भारतीय दंड संहिता कलम ३४९ स्त्रीला लज्जा उत्पन्न करणारे आणि तिच्या सभ्यतेला बाधा आणणारे वक्तव्य केल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल हाेताे. हा दखलपात्र असून 2 वर्षे सक्तमजुरी आणि दाेन हजार रुपये दंडाची शिक्षा आहे.