राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याच नाव आता छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्यानंतर राजकारण पेटलं आहे. एमआयएम पक्षाने या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात नापंसती दर्शवली आहे. याचदरम्यान, औरंगाबादचा नाव छत्रपती संभाजीनगर होतं, तर गुजरातमधील अहमदाबादचे नाव अहमदाबाद का?असा खोचक सवाल मनसेकडून भाजपला करण्यात आला आहे.
अहमदाबाद हे गुजरातमधील अत्यंत महत्त्वाचं शहर आहे. यामुळेच अहमदाबादचंही नामांतर करा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. औरंगाबादचं नामांतर होऊ शकतं तर अहमदाबादचं का नाही ? असा सवालच राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे. गुजरातमधील तरुणाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातल्याबाबत केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आमदार पाटील यांनी ही मागणी केली.अहमदाबाद मधील चांडोला तलावावरील अतिक्रमणाबाबत गुजरातमधील तरुणाने राज ठाकरे यांना ट्विट करत मदतीचं आवाहन केलं होतं.
