‘ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात’, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. यातच ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी एका मुलाखतीत गौप्यस्फोट केला आहे. ठाकरे गटाचे दोन खासदार त्यांची साथ सोडण्याच्या तयारी आहेत. असं पीयूष गोयल यांनी सांगितले. गोयल यांच्या वक्तव्यामुळे ते दोन खासदार कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटातील दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याची माहिती दिली आहे.

ते म्हणाले, “महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात चांगलं सरकार आहे. ठाकरेंनी त्याच्या सरकारच्या काळात प्रलंबित ठेवलेले प्रकल्प आताचं सरकार मार्गी लावत आहे. शिवसेना आमच्यासोबत आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची साथ सोडली, यासाठी आम्ही जबाबदार नाहीत” गोयल पुढे म्हणाले, काही मोजके खासदार सोडले तर बाकीचे आमच्या सोबत आहेत.आणखी दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत, अशी माहिती मला मिळाली आहे. विधिमंडळात तर हम दो हमारे दोन असेच राहतील.फक्त अडनाव वापरून चालत नाही, आता घराणेशाही चालणार नाही, असा टोला गोयल यांनी लगावला.