राज्यातील मोठं देवस्थान असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थांनाकडून 2001 साली तत्कालीन विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून सरकारकडून जमीन लिझवर घेऊन त्यावर अतिशय भव्य धार्मिक, अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून ‘आनंद सागर’ या पर्यटन आणि धार्मिक केंद्राची साडे तीनशे एकरवर उभारणी केली होती. अल्पावधीतच ‘आनंद सागर’मुळे शेगाव हे जगाच्या नकाशावर येऊन याठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक पर्यटन वाढलं होतं. पण मध्यंतरी काही कारणामुळे शेगाव संस्थानानं आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता ‘आनंद सागर’मधील फक्त आध्यात्मिक केंद्र आजपासून सुरू होणार आहे. हे अध्यात्मिक केंद्र भक्तांसाठी खुलं करण्यात येत आहे. पुढील काळात टप्प्याटप्प्यानं भाविकांसाठी इतरही काही सोयी सुविधा याठीकणी सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता संत गजानन महाराज भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे.
त्यामुळे ‘आनंद सागर’ उद्यानाला भेट देण्याची संत गजानन महाराजांच्या भक्तांची उत्सुकता संपणार आहे. कारण ‘आनंद सागर’ उद्यान भाविकांसाठी खुलं होणार आहे. दरम्यान यामध्ये भक्त आणि अध्यात्मिक अनुभूती घेणाऱ्यांसाठई एक आनंदाची बातमी समेर आली आहे ती म्हणजे आज पासून ‘आनंद सागर’ उद्यानातील फक्त अध्यात्मिक केंद्र खुलं करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता हळूहळू टप्याटप्याने येत्या तीन ते चार महिन्यात हे उद्यान आणि यातील सुविधा सुरू होणार असल्याचं सागण्याच येत आहे. त्यामुळे जगभरातून येणाऱ्या पर्यटक आणि भक्तांमध्ये आनंदाचा वातावरण पाहायला मिळत आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मिडीयाद्वारे हे उद्यान खुले करावे अशी मागणी करण्यात येत आहे.
शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे आनंद सागरमधील आध्यात्मिक केंद्र आजपासून भक्तांसाठी खुले होणार आहे. संत गजानन भक्तांना अनेक वर्षांपासून आनंद सागर अध्यात्मिक केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा होती. आनंद सागरमधील अध्यात्मिक केंद्र दररोज सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत सुरू राहील. या अध्यात्मिक केंद्रात गणेश, विष्णू, ब्रम्हा यांची मंदिर आहेत. ही मंदिर भक्तांसाठी खुले होणार असल्याने भक्तांची रेलचेल वाढणार आहे.
