शरद पवारांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची सांगत निवृत्तीची घोषणा केली. सध्या त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी कार्यकर्त्यांकडे 2-3 दिवसांचा वेळ मागितला आहे. मात्र, ते राजीनामा कितपत मागे घेतली, याविषयी शंका आहे. पवार यांनी निवृत्ती स्वीकारल्यावर राष्ट्रवादी बरोबरच महाविकास आघाडीत कमालीची अस्वस्थता आहे. दरम्यान, पवारांच्या या निर्णयामुळं पवारांच्या जागी आता कोण राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष होणार, याविषयी तर्क-वितर्क लढवले जात आहे. पुढचा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे दरम्यान, पक्षाध्यक्षपदासाठी अजित पवार की सुप्रिया सुळे अशी चर्चा सुरू असताना माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप करत मोठं वक्तव्य केलं आहे.
अजित पवार घोटाळेबाज आणि वेगवेगळ्या गुन्ह्यांत अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद देणे चुकीचे ठरेल, असा दावा महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
शरद पवार माझ्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहेत. मी अजूनही कामकाज सांभाळत. त्यामुळे शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय खुप घाईत घेतला. असं मत शालिनीताई पाटील यांनी शरद पवार यांच्या निर्णयावर व्यक्त केलं.तसेच अजित पवार घोटाळेबाज आणि गुन्ह्यामध्ये अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे त्यांना अध्यक्षपद देणं चुकीचं ठरेलं. अशी टीकाही शालिनीताई पाटील यांनी केली आहे.
शालिनीताई पाटील एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या, शरद पवारांच्या आमदारांचे म्हणणे आहे की असे अचानक निघून जाणे चुकीचे आहे. योग्य पर्याय जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत शरद पवारांनी निवृत्ती घेऊ नये. हा निर्णय त्यांनी घाईत घेतला आहे. मी आज 90 वर्षांची आहे. तरी लोक मला निवृत्ती घेऊ देत नाही. शरद पवार तर माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहेत, असे म्हणत शालिनीताईंनी शरद पवारांना ज्येष्ठतेचा सल्ला दिला.
